अमरावतीला असलेले भातकुली तहसील, पंचायत समिती  कार्यालय केव्हा जाणार भातकुलीला …?

0
1110
Google search engine
Google search engine

तालुका/प्रतिनिधी गजानन खोपे
भातकुली :-

भातकुली हे तालुक्याचे ठिकाण आहे. या गावाची स्वामी आदिनाथ दिगांबर जैन नावाने संपूर्ण भारतात ऐतिहासिक ओळख आहे. परंतु या गावाची दुर्दशा आहे. भातकुली तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमिलेख, तालुका विद्युत अभियंता कार्यालय, सब पोस्ट ऑफीस, ही सर्व तालुकास्तरावरील शासकीय कार्यालय जिल्हा मुख्यालयी ठिकाणी आहे.
प्राप्त माहीतीनुसार सन १९६0 मध्ये पूर्णानगर येथील नागरीकांनी नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. भातकुली कृषी तालुका कृषी कार्यालय अमरावतीच्या ठिकाणी देण्यात यावे. त्या ठिकाणी यांनी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
सन १९८0 मध्ये नागपूर खंडपीठाचे न्यायधीश श्री पांडे यांनी फेटाळली होती. व महाराष्ट्र शासनाला आदेश दिले होते. भातकुली तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय ही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी केसे काय आहे. यावर शासनाने अंमलबजावणी केली नाही. दरम्यान, भातकुली येथे शासनाने दिवाणी व फौजदारी न्यायलय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नायब तहसील कार्यालय, हे कार्यालय भातकुली येथे आहे.
भातकुली तालुक्यातील नागरिक या सर्व शासकिय कार्यालयमध्ये नेहमी ये-जा करण्यात व आपली कामे आटपून घेतात. भातकुली ला येण्याकरीता भातकुली हरताहामार्गे खोलापूर, भातकुली-म्हैसपूर वाठोडा शु. पुर्णानगर, भातकुली पांढरी मार्गे वनगांव टाकरखेडा, रासाऊर या मार्गे नेहती ये-जा करतात.
निवडणूक आली की भातकुली तहसीलचा विषय समोर करुन लोकप्रतिनिधी आपली राजकीय पोळी शेकतात. या हिवाळी अधिवेशनामध्ये भातकुली तहसिल व पंचायत समिती मुद्दा मांडावा अशी भातकुलीकर नागरीक करित आहे.