चांदुर बाजार येथे मराठी पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारणी घोषित –  श्री राजाभाऊ देशमुख यांची अध्यक्ष पदी एकमताने निवड

0
1329

चांदुर बाजार :-शशिकांत निचत :-

नुकत्याच झालेल्या तहसील कार्यालय चांदुर बाजार येथील रेस्ट हाऊस वर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी घोषित झाली असून त्याच्या अध्यक्ष पदी चांदुर बाजार येथील पत्रकार राजाभाऊ देशमुख यांची एकमतांनी निवड झाली आहे.संघटनेला मार्गदर्शक म्ह्णून जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वरराव बोराळकर यांच्या नावाला सर्वानी पसंती दिली.

शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याकरिता हि संघटना सदैव तप्तर राहतील तसेच संघटनेचा उपयोग आपल्या पेक्षा आपण संघटने साठी काय करू शकतो हेच उधिस्ट ठेवले पाहिजे अशी अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सर्व पत्रकारांना यावेळी संबोधले.
या संघटनेमधील पदाधिकारी खालील प्रमाणे असून त्याची सुद्धा निवड हि दिनांक 25 डिसेंबर च्या सभेमध्ये झाली आणि त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे.त्यामध्ये
संघटनेला मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर बोराळकर,अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, कासीम मिर्झा शहर उपाध्यक,रवींद्र औतकर ग्रामीण उपाध्यक,जगदीश ढोरे सचिव,धनंजय वांगे सहसचिव,प्रभुसिह राजपुरोहित कोषाध्यक्ष,शशिकांत निचत प्रसिद्धी प्रमुख,बादलकुमार डकरे जिल्हा कार्यालय प्रमुख,कार्यकारणी सदस्य म्हणून वैभव उमक,चेतन अबूलकर,केशवराव राऊत,किशोर मोकलकार,संदीप होले, किशोर मेटे,संदीप ढोले ,खलील बेग,इत्यादी पत्रकार उपस्थिती होती.
दिनांक 25 डिसेंबर च्या मासिक सभेमध्ये 6 जानेवारी 2018 ला पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाची नियोजन केले असून याची जबाबदारी शहर उपाध्यक कासीम मिर्झा,आणि ग्रामीण उपाध्यक रविंद औतकर यांच्या कडे सोपवण्यात आली.