प्रथम धामणगाव रेल्वे तर व्दितीय चांदुर रेल्वेने पटकाविले पारितोषिक – ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे आयोजित क्रिकेट सामन्यांचे समापन

0
591
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
चांदुर रेल्वे शहरातील ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे भव्य प्लास्टीक बॉल क्रिकेटचे खुले सामन्यांचे आयोजन अमरावती बायपास, मेटे कॉलनी जवळील टी. एस. ग्राऊंडवर करण्यात आले होते. या सामन्यामध्ये प्रथम पारितोषीक स्पीड क्रिकेट क्लब, धामणगाव रेल्वेने तर व्दितीय चांदुर रेल्वेतील क्रिकेट टिमने पटकाविले. या सामन्यांचा समारोप बुधवारी झाला.
      समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष निलेश सुर्यवंशी होते तर प्रमुख पाहुने म्हणुन न.प. उपाध्यक्ष देवानंद खुणे, पंजाबराव मेटे, नरेंद्र मेश्राम आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. या सामन्यांमध्ये प्रथम पारितोषीक नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टु सुर्यवंशी व उपाध्यक्ष देवानंद खुणे यांच्यातर्फे दहा हजार एक रूपये व शिल्ड स्पीड क्रिकेट क्लब, धामणगाव रेल्वेला, व्दितीय पारितोषीक नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांच्यातर्फे सहा हजार एक रूपये व शिल्ड चांदुर रेल्वे क्रिकेट टिमला तर तृतीय पारितोषीक नगरसेवक वैभव गायकवाड, टी. एस. ग्रुपतर्फे तीन हजार एक रूपये व शिल्ड मांजरखेड क्रिकेट टीमला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच बेस्ट मॅन ऑफ दि मॅच, बेस्ट मॅन ऑफ दि सिरिज, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट किपर, बेस्ट बॅस्टमन, बेस्ट फिल्डर, सिक्स सिक्सेस यांना वैयक्तीक बक्षीस म्हणुन ट्रॉफीसुध्दा देण्यात आली. या खुल्या सामन्यांमध्ये चांदुर रेल्वे, नेर, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वेसह भानखेड, लालखेड, टेंभुर्णी, मांजरखेड व इतर परीसरातील क्रिकेट टिम सहभागी झाल्या होत्या.
       सामन्यांच्या यशस्वीतेकरीता ‘दि ग्रेट टिपु सुलतान’ ग्रुपचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ, उपाध्यक्ष मोहम्मद इम्रान, सचिव इम्रान सौदागर, कोषाध्यक्ष युसुफ सौदागर, सहसचिव मोहम्मद दानिश, सदस्य सैय्यद जाहीद, राजिक कुरैशी, मोहसीन खान, मुख्तार शाह, गुलफाम शाह, सैय्यद उमेर, मोहम्मद नदीम, शेख आसीफ, मोहम्मद जुबेर, शेख इरशाद, काझी इस्लाम, कासिम कुरैशी, नवाज कुरैशी, अशरफ अली, अब्दुल्ला कुरैशी, शोएब बैग, मोहम्मद जुनैद आदींनी अथक परीश्रम घेतले.