लोणटेक चौफुलीवर भीषण अपघात – महिलेचा जागीच मृत्यू – ट्रकने महिलेस चिरडले

0
639
Google search engine
Google search engine

अमरावती : भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने अॅक्टीवा दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यु झाला. हा हृदयद्रावक अपघात आज रविवारी दुपारी अकोली वळन मार्गावर लोणटेक चौफुलीवर घडला. उषा नारायण गाडबैल (४५) असे मृतक महिलेचे नाव असून त्या भातकुली तालुक्यातील गणोजा देवी या गावातील रहिवासी होत्या.
उषा गाडबैल आणि त्यांचा २५ वर्षीय मुलगा सुशांक हे दोघे अॅक्टीवा दुचाकीने अमरावती येथे आले होते. आज दुपारी अकोली रिंगरोडने ते भातकुली मार्गे गणोजा देवी गावाकडे जात असतांना लोणटेक चौफुलीवर खोलापूरी गेट येथून वाठोडा शूक्लेश्वर कडे जात असलेल्या एम. एच. २७, जे. ४१९२ क्रमांकाच्या भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर खाली पडलेल्या उषा गाडबैल या ट्रकच्या चाकाखाली आल्या. ट्रकचे समोरचे चाक उषा यांच्या छाती व चेह:यावरुन गेले. अपघातात उषा गाडबैल यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. त्यांचा मुलगा सुशांत याला किरकोळ दुखापत झाली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपी ट्रकचालक सतीश अशोक नेतनवार (५०) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.