भीमा कोरेगाव प्रकरण चांदुर बाजार येथे शांततेत बंद- पोलिसांचा तगडा बंदोबस्त,तर विद्यार्थ्यांचे हाल

0
1503

चांदुर बाजार :-//बादल डकरे –

भीमकोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारी ला शौर्य दिनानिमित्त या ऐतिहासिक स्तंभाला 200 वर्षं पूर्ण झाले असल्याने त्या ठिकाणी शूरवीराणा अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो संख्येच्या पटीत भीम अनुयायी त्या ठिकानीं आले होते.मात्र त्यानचावर जातीयवादी लोकांनी भ्याड हल्ला केला होता.तसेच या हल्ल्यामधे एका युवकास प्राण गमवावे लागले.त्याची पडसात संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.

याच घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्याकरीता चांदुर बाजार तालुक्यात आज बंद चा आवाज भीम अनुयानी पुकारला होता.दिनांक 3 जानेवारी 2018 ला सकाळी 6 पासून या बंद चे वातावरण तालुक्यात निर्माण होऊ लागले.

तालुक्यातील जयस्थभचौक,नेताजी चौक,किसान चौक,पंचायत समिती परिसर, बेलोरा स्टॉप,सराफा लाइन या सर्वच ठिकाणची दुकाने या वेळी बंद होती.

तिकडे महाविद्यालयात आलेले विधार्थी याना घरी जाण्यास बसेस या बंदमुळे आगारचा बाहेर निघालच्या नाही. त्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. या बंदचा परिमाण हा व्यावसायिक तसेच जन सामान्य जनतेवर ही झाल्याचे दिसून आले.नेहमी भरगच्च गर्दी असणारी तालुक्यातील स्ट्रेट बँक ऑफ इंडिया मध्ये गर्दीच नव्हती.त्यामुळे भीम अनुयायी यांनी जो बंद तालुक्यात पुकारला होता तो पूर्णपणे यशस्वी झाला असे दिसून आले आहे.

तिकडे बंदमुळे जनसामान्य याना त्रास होणार नाही याकरिता चांदुर बाजार येथील पोलीस अधिकारी कर्मचारी हे जागोजागी तैनात होते.शाळा बंद करण्याचे माहिती मिडाल्यावर वर लहान मुलाच्या शाळेचा बसेस ला मुख्य रस्त्यावर पोहचे पर्यंत चांदुर बाजार येथील पोलीस कॉस्टबल अनिल इंगळे,आणि नितीन डोगरे यांनी काळजी घेतली.या बंदमुळे कोठेही वाहनांची गर्दी होणार नाही बसेस ला नुकसान होणार यांनी याकरिता सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण आणि पोलीस कॉस्टबल पंकज फाटे हे आपल्या टीम सोबत चांदुर बाजार आगार मध्ये तळ ठोकून होते.
भीम अनुयायी यांनी पूर्ण शहरातून भीमकोरेगाव प्रकरण निषेधार्थ संपूर्ण शहरातून निषेध रॅली काढली.नंतर ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून चांदुर बाजार तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निवेदन देण्यात आले.आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या श्री मिलिंद एकबोटे आणि श्री संभाजी भिडे गुरुजी ,घुगे याना मोका अंतर्गत लवकरात लवकर अटक करून त्यांच्या कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सुध्दा अनुयायी यांनी यावेळी केली.शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे अशी विनंती या निवेदन मध्ये करन्यात आली.निवेदन देताना विलास पंचभाई,रमेशभाऊ ततरपाले ,राहुल पाटील,प्रशांत लोणारे,सचिन गवई,अमृतराव बोरकर,नाजूकरव नवले ,विजय वानखडे,अमृतराव वानखडे,भारती ताई भोवते,इंद्रायणी आठवले,धनराज शेंडे,मोनिकाताई कोकणे,तसेच मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.