मध्यप्रदेशातुन गावठी दारू सप्लायर अखेर पोलिसांच्या जाळ्यात-आज सकाळी 4 च्या सुमारास काजळी येथे पोलिसांची नाकाबंदी करून  कार्यवाही

0
636
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार / बादल डकरे –

चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील काजळी येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारूचा व्यवसाय सुरू होताच त्याच प्रमाणे पोलिसांच्या कार्यवाही सुरूच होत्या.गावठी दारूचा व्यवसाय करणारे गावठी दारू ज्या ना त्या ठिकाणी लपवू लागले .तरी मात्र चांदुर बाजार येथील पोलीस त्याचा तपास लावताच होती.मात्र इतक्या कार्यवाही करूनही गावठी दारू बंद होण्याचे नाव घेतच नव्हते.अखेर पोलिसांनी मुख्य गावठी दारू सप्लायर याला ताब्यात घेण्याचे ठरविले होते.

2-3वेळा चांदुर बाजार पोलिसांनी सापळा रचला मात्र तो अपयशी ठरला.मात्र दिनांक 2 जानेवारी 2018 ला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांदुर बाजार येथील पोलीस कर्मचारी विरेंद्र अमृतकर,सहायक पोलिस उपनिरीक्षक सिध्दीख शेख,शांताराम सोनोने आणि गावातील युवकांच्या मदतीने गुप्त माहिती च्या आधारे रामदास दादाराव कस्थुरे रा.पाळा, विनोद मयराम बारसकर रा.खोमाई मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले.

याच्याकडून पोलिसांनी बजाज बॉक्सर क्रमांक MH27 AT0298 अंदाजित किंमत 10,000 आणि गावठी दारू 50 लिटर किंमत 5,000 अशा एकूण रुपये 15000 चा माल जप्त केला.आणि आरोपी याना ताब्यात घेतले.

हे दोन्ही ही आरोपी खोमाई -पाळा-शिरजगाव कसबा-देऊरवादा-काजळी या मार्गाने गावठी दारूचा सप्लायलार करीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.पोलिसांच्या कार्यवाही मुळे गावठी दारू चा व्यवसाय करणारे याचे चांगले दाबे दनालले आहे.

वरील कार्यवाही चांदुर बाजार येथील ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टबल विरेंद्र अमृतकर,शांताराम सोनोने सहायक पोलिस उपनिरीक्षक सिध्दीख शेख यांनि केली.या कार्यवाही ला काजळी येथील युवकांनी सहकार्य केले.