घुईखेड येथे माझी माय हॉस्पीटलतर्फे भव्य रोग निदान शिबीर संपन्न – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत आयोजन

0
665
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
    महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत चांदुर रेल्वे येथिल माझी माय हॉस्पिटलतर्फे घुईखेड येथील आरोग्य केंद्र येथे भव्य रोगनिदान शिबिर गुरूवारी घेण्यात आले. या शिबिरामध्ये 145 रुग्णांची तपासणी करण्यात आली व चार रुग्ण पुढील उपचाराकरिता संदर्भित करण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये घुईखेड येथील कमलाबाई कुडे यांचे हाड फ्रॅक्चर झाले होते, त्यांची या शिबिरात तपासणी करण्यात आली व लगेच 108 एम्बुलेंसने माझी माझी माय हॉस्पीटल येथे सर्जरी करिता रेफर करण्यात आले. ती सर्जरी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत यशस्वीरीत्या पूर्णतः मोफत केल्या गेली.
यावरून हॉस्पिटलची रूग्णाविषयी तत्परता दिसून आली.  या शिबिराला घुईखेड येथील डॉ. हेमंत जाधव, नंदुभाऊ काकडे, रविंद्र उदयकर, सचिन मेहेर, अनिल चनेकार, शंकरराव भोयर, विजय मलोडे, पत्रकार धीरज नेवारे यांच्यासह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉ. नरेंद्र दाबेराव, माझी माय हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राजेंद्र ठाकूर, डॉ. योगेश बंग, आरोग्यमित्र नीलेश हगवने, कैलास राठोड,  आशीष बन्सोड, धनराज चौव्हाण, सुधीर मेश्राम, शितल झलके, रविना ढोणे, कुणाल बालबन्सी यांनी मोलाचे सहकार्य केले.