कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण- श्री मिलिंद एकबोटे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली <> कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

0
623
Google search engine
Google search engine

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील  श्री मिलिंद एकबोटे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

सकाळच्या सत्रात श्री  मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला होता. पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल करताना चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा करत हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

तात्काळ सुनावणीसाठी बुधवारी हे प्रकरण नव्या खंडपीठापुढे सादर करण्यात आलं होतं. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेण्यास नकार देत, दुसऱ्या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश एकबोटे यांना दिले होते. त्यामुळे एकबोटे यांनी दुपारी दुसऱ्या खंडपीठापुढे आपली याचिका सादर केली. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी झाली.