रेती माफिया,महसूल आणि पोलीस यांची जुगलबंदी

0
689
Google search engine
Google search engine

रेती माफिया आणि पोलीस यांचे अच्छेदिन

तहसील मधील अनेक कर्मचारी रेती माफिया यांच्या संपर्कात

चांदुर बाजार –

चांदुर बाजार तालुक्यातील काही भागातील रेती च्या घाटाचे हरास झाले तर काहीचे व्हायचे आहे.मात्र यांच्या फायदा हे रेती तस्कर आणि काही पोलीस स्टेशन मधील अधिकारी घेत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

चांदुर बाजार तालुक्यात चार पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये चांदुर बाजार,ब्राम्हनवाडा थडी ,आसेगाव शिरजगाव कसबा हे पोलीस स्टेशन आहे.तहसील कार्यलय हे स्थानिक चांदुर बाजार च्या ठिकाणी आहे.चांदुर बाजार तालुक्यातील असलेल्या रेती घाटाचे हरास झाले आहे.त्यामुळे रेती ची वाहतूक करणारे हे पास काडून रेतीची वाहतुक करीत आहे तर यांचा फायदा पण सर्वच रेती वाले घेत आहे.सकाळी पासून रात्र भर पास कशी मिळते?हा प्रशा असला तरी रेती माफिया यांची वाहतूक दिवसभर तर असतेच मात्र रात्री ला पण ते सुरूच असते.
या रेती माफियावर कार्यवाही करण्याचे काम हे स्थानिक पातळीवर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची आहे मात्र यांचे पण रेती माफिया यांच्या हितसंबंध असल्याचे दिसत आहे तर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे पण या वाहत्या गंगे मध्ये आपले हात ओले करीत असल्याचे दिसत आहे.

तिकडे तहसीलदार यांच्या अत्यंत जवळचे काही कर्मचारी हे रेती माफिया यांची पाठराखण करीत आहे.त्यामुळे तहसीलदार यांचा निदर्शनास या गोष्टी कधी येणार?तसेच दोषी वर कार्यवाही करणार का तहसीलदार असे अनेक प्रश्न महसूल विभागात असले तरी पोलीस विभागात सुद्धा ठाणेदार याची पडताळणी करणार काय?नुकतेच चांदुर बाजार चे ठाणेदार यांची बदली झाली याचा फायदा हे अधिकारी तसेच कर्मचारी चांगल्या प्रकारे घेत आहे.नवीन ठाणेदार वायधंदे यांची चांदुर बाजार पोलीस स्टेशन चा चार्ज घेताच कार्यवाहिला सुरुवात केली.मात्र ही कार्यवाही सतत राहतील का अस प्रश्न तालुक्यातील जनते समोर आहे.