कॉग्रेश पुन्हा आक्रमक

0
852
Google search engine
Google search engine

👉🏻पेट्रोल ,डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढी निषेधार्थ कॉग्रेश उतरली रस्त्यावर

👉🏻चांदुर बाजार तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन

चांदुर बाजार :-

सामान्य आयुष्य जगत असताना मूलभूत गरजा भागविण्यासाठी ज्या प्रमाणे अन्न, वस्त्र ,निवाऱ्याची गरज असते त्याच प्रमाणे त्या गरजा पूर्ण करण्यासाठी पेट्रोल ,डिझेल,आणि गॅस सिलेंडर च्या दरात जी वाढ झाली त्यामुळे या चा फटका हा सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसत आहे.याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज चांदुर बाजार तसेच मतदार संघातील अनेक पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.चांदुर बाजार तसेच ग्रामीण भागातील अनेक शेतकरी,मजूर वर्ग यावेळी निवेदन देताना उपस्थित होते.सुरुवाती पासून शेतकरी हा आर्थिक तसेच नैसर्गिक सकटा मध्ये अडकला आहे.त्यात सतत होणारी पेट्रोल आणि डिझेल तसेच गॅस सिलेंडर च्या दरवाढि मुळे सामान्य जनतेच्या तसेच शेतकरी वर्ग याचे समोर मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रश्न उपस्थित होते आहे

चांदुर बाजार येथील तहसीलदार गजानन पाथरे आणि अर्जुन वांदे याना हे निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना अचलपूर मतदार संघ युवक कॉग्रेस अध्यक्ष समीर देशमुख,सचिव विकास सोनार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रदीप वाघमारे,किशोर देशमुख,नितीन देशमुख,किशोर कीतुकले,बाबू भाऊ इनामदार,तसेच तालुक्यातील तसेच ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी आणि कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.