रेल्वे थांबा द्या अन्यथा रेल्वे बोर्डात ठिय्या आंदोलन – रेल रोको कृती समितीची चेतावनी >< नितीन गवळींच्या नेतृत्वात नागपुर रेल्वे बोर्डात निवेदन

0
748
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान .) 
 चांदुर रेल्वे येथील रेल्वे थांब्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघडत चालला आहे. खासदार रामदास तडस यांनी दोन महिन्यांत थांबा मिळाला नाही तर भारतीय रेल्वे, नागपुर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता येत्या काही दिवसांत रेल्वे थांबा मिळाला नाही तर थेट नागपुर येथील रेल्वे बोर्डात ठिय्या आंदोलन करण्याची चेतावनी शहरातील रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातुन दिली आहे.
      चांदुर रेल्वे शह­राच्या आजुबाजुने जवळ­पास ५०-६० गावे ला­गलेली आहे. दररोज शेक­डो नागरीक शहरातुन ये- जा करतात. नागरीकां­­सह व्यापाऱ्यांना ने­­हमीच दुरवर प्रवास करावा लागतो. मात्र शहराला अनेक मुख्य रे­ल्वे गाड्यांचे थांबे नस­ल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. यामु­ळे रेल रोको कृती समी­तीतर्फे जबलपुर एक्स­प्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस व इतर काही गाड्यांच्या थांब्यासाठी १५ ऑक्टो­बर २०१२ ला भव्य जनआं­दोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता दिल्ली व नागपुर रेल्वे बोर्डात निवेदन देऊन रेल्वे थांब्याची मागणी केली होती. दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सुरू झालेल्या काझीपेठ-पुणे गाडीला सुध्दा केवळ चांदुर स्टेशवनरच थांबा देण्यात आलेला नाही. मात्र निवेदनाची दखल रेल्वे बोर्डाकडुन घेतल्या जात नसल्याचे रेल रोको कृती समितीचे म्हणने आहे. खासदार रामदास तडस यांनी ही यासाठी प्रयत्न केले आहे. तसेच खासदार तडस यांनी सदर थांबा न मिळाल्यास येत्या २५ फेब्रुवारीला २ महिने पुर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वे, नागपुर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र ही दुर्भाग्यपुर्ण बाब असुन खासदार, शहरातील नागरीक अनेक वर्षांपासुन एक रास्त मागणी करीत असुन रेल्वे बोर्ड याकडे दुर्लक्ष करीत आहे. अमरावती रेल्वे स्टेशनपासुन टिमटाला रेल्वे स्टेशनपर्यंत कॉर्डलाईन टाकल्यामुळे रेल्वे विभागाचा २३ मिनीटांचा वेळ वाचत आहे. त्यातीलच २ मिनीटे देऊन शहराला रेल्वे थांबा देण्यात यावा, अन्यथा २५ फ्रेब्रुवारीनंतर कधीही रेल्वे बोर्डात ठिय्या आंदोलन करण्याची चेतावनी रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी, कॉ. विनोद जो­शी, मेहमुद हुसेन, कॉ. देविदास राऊत, कॉ. विजय रोडगे, राजाभाऊ भैसे, बंडुभाऊ याद­­व, कॉ. रामदास कारमोरे, विनोद लहाने, गौ­तम जवंजाळ, संजय डगवा­र आदींनी निवेदनाच्या माध्यमातुन नागपुर रेल्वे बोर्डाचे व्यवस्थापक यांना दिली आहे..