बहुचर्चित, गूढ ‘राक्षस’ येतोय २३ फेब्रुवारीला

0
1155
Google search engine
Google search engine

–  ‘फॅन्ड्री‘ आणि हाफ तिकीट‘ या यशस्वी आणि अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या टीमचा नवा आगामी सिनेमा –राक्षस‘ .

 

 लेखक, दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग यांची कलाकृती राक्षस

 

अनिल चौधरी, पुणे 

‘राक्षस’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण. जंगल हे फक्त जीवसृष्टीनेच भरलेले नसून त्यात अनेक क्लिष्ट कोडी दडलेली असतात. जेव्हा सामान्य माणूस हा जंगलांच्या गूढ दुनियेत शिरतो तेव्हा नेमकं काय घडतं हे ‘राक्षस’च्या माध्यमातून प्रेक्षकां समोर  येणार आहे. मराठी मधील बहुचर्चित  सस्पेन्स थ्रिलर  असलेल्या ‘राक्षस’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला यामुळे ‘राक्षस’ बद्दल प्रेक्षकांच्या मनातील उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

 

‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांच्या  ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती उत्कंठा आता या ट्रेलर मुळे आणखी वाढली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे.

 

‘राक्षस’ ही एक जंगलात घडणारी कथा आहे. जंगल म्हणजे फक्त घनदाट झाडांचा समूह नाही तर त्याला ही भावना असतात, जंगल हसतं, रडतं, गाणं  गातं. किर्रर्र अशा अरण्यात  एक छोटी मुलगी आपल्या आईला सांगतेय  बाबांना  राक्षसाने गिळलय’,  तर दुसरीकडे  सई ताम्हणकर कशाचा तरी शोध घेताना दिसत आहे. शरद केळकर आदिवासी पाड्यावर  तर कधी जंगलात दिसतोय. हे नेमकं काय रहस्य आहे? याचे उत्तर  ‘राक्षस’ या  चित्रपटात बघायला  मिळणार आहे.

 

राक्षस चित्रपटात बालकलाकार ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सईद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे, पंकज साठे, अनुया कळसकर,अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयानं वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे. आदिवासी पाडयांवर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी तन्मयी देव यांच्यासह ‘राक्षस’ची कथा लिहिली आहे. या  ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना समजणार आहे.