प. पु. जितेंद्रनाथ महाराज यांना हिंदु जनजागृती समितीकडून अमरावतीला होणाऱ्या सभेचे निमंत्रण

0
673

 

अमरावती– विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी संस्थानकडून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ पीठाचे पीठाधीश प.पु.जितेंद्रनाथ महाराज यांचे सुद्धा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात 11 फेब्रुवारी ला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले.त्यावेळी समितीचे डॉ. श्री रमेश वरूडकर व डॉ.सौ. समिधा वरूडकर यांनी महाराजांना निमंत्रण दिले. यावेळी मी तुमच्यासोबतच आहे असे आशीर्वाद सुद्धा महाराजांनी दिले.