चांदुर बाजार येथे 11 फ्रेब्रुवारी ला मराठी कलाकार

0
981

👉🏻जगदंब पब्लिक स्कुल स्नेहसंमेलन 2018 ला मेघना एरंडे याची उपस्थित

चांदुर बाजार :-

विधार्थी याच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा. विधार्थी यांनी आपल्या शालेय जीवनात त्या सर्व गोष्टीचा आनंद घायवा या उद्देशाने आणि समाजात एक यशस्वी पाऊल त्या विधार्थी याने ठेवले पाहिजे ही एक आशा धरून स्थानिक चांदुर बाजार तालुक्यातील मुक्ताई बहुउद्देशीय संस्था ,चांदुर बाजार द्वारा संचालतील जगदंब पब्लिक स्कुल चे अध्यक्ष विनोद कोरडे करीत आहे.

त्यांनी एक जगदंब पब्लिक स्कुल चे एक लहान रोपटे 5 वर्षा अगोदर लावले होते आज ते एक कल्पतरू वृक्ष म्हणून सर्व समोर उभे आहे.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा जगदंब पब्लिक स्कुल च्या सेहसंमेलन चे आजोजन जगदंब पब्लिक स्कुल बेलोरा रोडच्या मैदानात दिनांक 11 आणि 12 फ्रेब्रुवारी ला आयोजित करण्यात आले असुन या स्नेहसंमेलन च्या विषय आकर्षण म्हणजे आपल्या वेगवेगळ्या आवाजातून मग ते कार्टून असो,नॅशनल जियोग्राफी चैनल असो,की रेल्वे टेंशन वरील आवाज याचे दबीग करणारे मराठी आवाजाचे कलाकार म्हणून समाजात आपली ओळख करणारे मेघना एरंडे याची उपस्थिती दिनांक 11 फ्रेब्रुवारी ला सायंकाळी 6 च्या दरम्यान राहणार आहे.तसेच कार्यक्रम चे उदघाटन त्यांचे हस्ते होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष विनोद कोरडे यांनी दिली. त्याचप्रमाणे सारेगमप विजेता महागायिका कु.अंजली गायकवाड याची सुरेल अशी मैफिल रंगणार आहे.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार बच्चूभाऊ कडू, प्रमुख अतिथी म्हणून अमरावती शिक्षण उपसंचालक सी.आर.राठोड,तहसीलदार चांदुर बाजार शिल्पाताई बोबडे,माध्यमिक शिक्षण अधिकारी नीलिमा टाके,प्राथमिक शिक्षणाधिकारी अमरावती आर.डी. तुरणकर,वामन बोलके उपशिक्षण अधिकारी अमरावती,विलासराव इंगोले माजी महापौर महानगरपालिका अमरावती,ड्रॉ सुरेश लकडे प्राचार्य स्कुल ऑफ स्कालर्स अमरावती,रवींद्र पवार नगर अध्यक्ष चांदुर बाजार याची उपस्थिती राहणार आहे.

तसेच दिनांक 12 फ्रेब्रुवारी ला चांदुर बाजार तालुक्यातील अनेक मान्यवर याची उपस्थित राहणार असनु कार्यक्रमनाचे आयोजन करते विनोद कोरडे अध्यक्ष जगदंब पब्लिक स्कुल चांदुर बाजार,नितीन कोरडे चांदुर बाजार नगर परिषद नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते मनोजदादा कटारिया आणि उदय देशमुख आहे.