अमरावती येथे आज ‘हिंदु धर्मजागृती सभा’ ! -संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर हिंदु एकतेचा आविष्कार

0
1281
Google search engine
Google search engine
विशेष उपस्थिती :-

सनातन संस्थेचे प्रसारसेवक सद्गुरू श्री नंदकुमार जाधव

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री सुनिल घनवट

रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर

अमरावती- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर आज हिंदु धर्मजागृती सभेचे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्ववाद्यांच्या बैठका, होर्डिंग, भित्तीपत्रके, सामाजिक संकेतस्थळे, उद्घोषणा या विविध माध्यमातुन सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आलेला आहे. अनेकांच्या मनामध्ये हा हिंदुत्वाचा आविष्कार पाहाण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
        या धर्मसभेला वक्ते म्हणून सनातन संस्थेचे प्रसारसेवक सद्गुरू श्री नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री सुनिल घनवट व रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर हे असणार आहे. राष्ट्र व धर्मावर होणाऱ्या अनेक आघातांवर काय उपाययोजना करायला हवी तसेच हिंदुराष्ट्र स्थापनेची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
        धर्मसभेच्या ठिकाणी क्रांतिकारकांचे चरीत्र, हिंदुराष्ट्र, धर्मशिक्षण, राष्ट्ररक्षण या विषयांच्या चित्रप्रदर्शनी लावण्यात येणार आहे. सनातन संस्था निर्मीत आयुर्वेद, सण व उत्सव, अध्यात्म, बालसंस्कार, राष्ट्र आणि धर्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. या सोबतच, सनातनची सात्विक उत्पादने व ग्रंथ यांचे प्रदर्शन असणार आहे.सर्वांनी आपले धर्मकर्तव्य म्हणून या धर्मजागृति सभेला उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.