*ब्रिलीयंट किडस काँन्व्हेंट गांधीपूल नृत्यस्पर्धेत प्रथम*

0
785

अचलपूर:- नगरपालिका प्राथमिक इंग्रजी शाळा सुलतानपूरा अचलपूर येथे वयोगट ५ ते १० वर्षाच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध शाळेचे स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत पीपल्स वेलफेअर अँन्ड एज्युकेशन मल्टीपरपज सोसायटी अब्बासपूरा व्दारा संचालित ब्रिलीयंट किडस काँन्व्हेंट स्कुल गांधीपुल अचलपूर यांचा प्रथम क्रमांक प्राप्त केला.काँन्व्हेंटचे विद्यार्थी लहान असून अतिशय सुंदर नृत्य सादर करून यश संपादन केले याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांनी विविध देशभक्ती गित व सर्वधर्म समभावाचे उत्कृष्ठ प्रर्दशन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेश भागवत जगदंब विद्यालयाचे अध्यक्ष रमाकांतजी शेरकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक एका कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना केले.कार्यक्रमाला असंख्य पालक व मान्यवर नागरीक उपस्थीत होते यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती भुजाडे,जयश्री तगारे,मेघा भागवत,भाग्यश्री वाठ,विद्याताई शेवाने,रंजना हेडाऊ व संध्या कोरडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला उपाध्यक्ष नंदकिशोर काठोके,कोषाध्यक्ष राजेश तगारे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच जगदंब विद्यालयाचे नाकील,विखार,पचारे,घुलक्षे व वाचनालयाचे प्रमुख सिद्धार्थ इंगळे प्रामुख्याने उपस्थीत होते.