*विद्युत वितरण कंपनीने देयके स्विकारण्याची संकलन केंद्रे वाढवावी*

0
594

अचलपूर:-अचलपूर शहरात विद्युत देयके भरण्याची अपुरी व्यवस्था असल्याने ग्राहकांची होत आहे तारांबळ त्यामुळे विद्युत देयके स्वीकारण्यास जादा संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्याचे आवश्यकता आहे.
अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातील निम्म्या पेक्षा जास्त लोकवस्ती अचलपूर शहरात आहे तसेच विद्युत ग्राहकांची संख्यासुध्दा अधिक आहे.या शहरात विद्युत देयक स्वीकारण्यास केवळ एकच संकलन केंद्र आहे त्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडाली आहे.आँनलाईन देयक भरण्याची सोय सुध्दा उपलब्ध नाही कारण इंटरनेट कनेक्टीव्हीटी सुध्दा गेल्या काही दिवसांपासून नसल्याने ही सुध्दा ग्राहकांना सोय नाही.अचलपूर शहरात अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अचलपूर येथे ही देयके स्वीकारली जातात गेल्या काही दिवसांपासून येथे ग्राहकांची तोबा गर्दी होत आहे देयक भरण्याची मुदत संपत आलेली आहे.मोलमजुरी व नोकरदार वर्ग कामधंदे सोडून रांगेत उभे राहून विद्युत देयक भरण्याची एकच गर्दी होत आहे यामुळे एकतर त्यांचा अमुल्य वेळ तर जात आहेच पण विद्युत देयक भरण्याची अंतीम मुदत संपली तर आर्थिक भुर्दड सुध्दा त्यांना सोसावा लागेल म्हणून विद्युत वितरण कंपनीने अचलपूर शहरात असे संकलन केंद्रे वाढवावी अशी जनतेची मागणी आहे.