*श्रद्धेय बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनी मुकबधिर शाळेतील विद्यार्थांसोबत माणुसकीचे स्नेहभोजन*

0
805
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –
स्थानिक माणुसकी बहुद्देशीय संस्था व संत गजानन मंदिर समिती, संताबाई यादव नगर  व्दारे श्रध्देय बाबा आमटे यांच्या स्मृती दिन साजरा करण्यात आला. स्मृतीदिनाचे औचित्य साधून अपंग मुकबधिर सेवा संस्थान सोनगाव, ता.चांदुर रेल्वे येथील बालगोपालां सोबत स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला.
वंचितासाठी कार्य करण्याचा विडा उचललेल्या माणुसकी संस्थेकडुन असे कार्य अविरत चालत राहील हाच मनोदय माणुसकी संस्थेचा आहे.यावेळी संस्थेचे प्राविण्य देशमुख,भूषण सरदार, प्रतिक राय, दिनेश वाघाडे,सारंग देशमुख,वैभव गायकवाड,अक्षय ठोंबरे,सनी सावंत,शहजाद सौदागर,शुभम देशमुख,अंकित देशमुख,प्रणय राय तसेच अपंग मुकबधिर सेवा संस्थान सोनगावचे सोनाली भोयर,संदीप लांजेवार,मिनल भगत,राजेश लांजेवार आदी कर्मचारी उपस्थित होते…