पळसखेड येथे मोठया उत्साहात महाशिवरात्री महोत्सव – सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
796
चांदुर रेल्वे:- (शहेजाद  खान) –
मानवी जीवनाचा प्रवास अधिक सुखादाई करण्यासाठी व पारिवारिक जीवनात आनंदी आनंद निदान होऊन जीवन साफल्य झाल्याचा आनंद या करिता येथील श्री. क्षेत्र सिद्धेश्वर संस्थान, पळसखेड येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
  खोलाड नदीच्या तिरावर अति प्राचीन असलेलं श्री. सिद्धेश्वर संस्थान या ठिकाणी नाथ पंथी लोकांनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली होती. जंगलात फिरत असताना त्यांच्या प्रवास काळात नाथ पंथी लोकांनी या ठिकाणी विसावा घेण्यासाठी आपली राहुटी मांडली, तेव्हा पूजा अर्चना करण्यासाठी पिंडीची स्थापना केली.
लहान असलेली पिंड ही कालांतराने मोठी झाली शेजारीच असलेल्या खोलाड नदीच्या प्रवाहाने सुद्धा ही पिंड वाहून गेली नाही. यामुळे गावातील भाविकांच्या श्रद्धा आणखी वाढत गेल्या, त्या ठिकाणी मोठं मोठी वळाचे झाडे ही धार्मिक स्थळाला साक्ष देणारी मोठ्या डोलात उभी आहे. त्यानंतर नारायण महाराज व्यास हे ही याच ठिकाणी वास्तव्याला होते. नंतर विठ्ठल रुख्मिनी मंदिर त्या ठिकाणी उभारण्यात आले. गावातील लोकांनी त्याच ठिकाणी मोठे सिद्धेश्वराचे मंदिर बांधले  व त्याचे रूपांतर हे संस्थान मध्ये झाले, तेव्हा पासून या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सवाव मोठ्या उत्साहात  साजरा केल्या जातो. या महोत्सवामध्ये संगीतमय भागवत सप्ताहचे आयोजन करण्यात आले. पाच दिवसांपासून ह.भ.प.रवींद्र महाराज केंद्रे आळंदीकर यांच्या मधुर वाणीतून भाविक भागवत कथेचे श्रावण करीत आहे. याच सोबत सात दिवस ज्ञानेश्वरी वाचन, सकाळी काकड आरती सायंकाळी हरिपाठ व रात्री भजन व हरि कीर्तन सुरू आहे.  महाशिवरात्रीच्या दिवशी मंगळवारी गावातून भव्य ग्रंथ दिंडी शोभायात्रा काढण्यात आली. आज बुधवारला काल्याचे कीर्तन व  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या विश्वस्थांनी केले आहे.