सर्व हिंदुत्ववादी संघटनांना एकत्रित पने घेऊन चालणारी समिती म्हणजे हिन्दू जनजागृति समिति – शिवसेना खासदार श्री आनंदराव अडसूळ

0
707

अमरावती :-

अमरावती येथे हिंदुधर्म जागृती सभा संपन्न

शिवसेना खासदार श्री आनंदराव अडसूळ सभेत बोलताना म्हणाले कि हिंदू जनजागरण समिती देशभर धर्माचा प्रचार प्रसार करते दरवर्षी पार्लमेंट मध्ये आमचा कार्यालयामध्ये हि मंडळी येतात विविध प्रकारचा मार्गदर्शनाची पुस्तके आम्हाला देतात , आणि गेल्या आठवड्या मध्ये माझा राहत्या घरी हि मंडळी आली माझे पदाधिकारी योगायोगाने उपस्थित होते आम्ही हिंदु जन जागृती सभा आयोजित करीत आहोत आपण आल पाहिजे  तत्काळ मी आणि सर्वांनी त्यांना होकार दिला , हिंदू धर्माशी संबंधित खूपसाऱ्या संघटना आहेत त्यात शिवसेना, RRS , बजरंग दल ,हिंदू महासभा , आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारी हिंदू जनजागरण समिती आहे. मला समिती बद्दल गर्व आहे अभिमान आहे  असेही ते म्हणाले. माननीय शिवसेना प्रमुख नेहमी म्हणत माझ हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आमच शत्रू राष्ट्र जेव्हा आमच उल्लेख करत तर तेही हिंदुस्थान अस म्हणत अस मी पार्लमेंट मध्ये राष्ट्रपती यांचा अभिभाषणावर मला बोलायचं होत तेव्हा जाणीवपूर्वक मी या गोष्टीचा उल्लेख केला असेही ते म्हणाले. हा देश आमचा आहे हिंदूंचा आहे , अनेकांचे लाड पुरवले जातात जे देशातील जनतेला छळतात त्यांच संरक्षण केल जात , अफजल गुरु सारख्या माणसाला फाशीचा शिक्षेसाठी सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल परंतु त्या सरकारने त्याला फाशी देण्यासाठी टाळाटाळ केली.  यावेळी बोलताना पाण्याचा वक्तय आल्यामुळे श्री अडसूळ यांना आपले बोलणे थांबवावे लागले.