हैदराबाद : प्रिया वारियर अवघ्या काही तासात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे हे आपण सर्वांनी पाहिलं , मात्र हैदराबादमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीमुळे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटात प्रिया झळकलेल्या ‘मणिक्या मलराया पूर्वी’ गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. मात्र तक्रारीत प्रियाविरोधात कोणतेही आरोप नसल्याबाबत माहिती आहे
‘मणिक्या मलराया पूर्वी’ या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही.