का सोडली नान पटोले यांनी भा ज प?

0
1135

शेगांव:-भाजप समर्थीत खासदार नान पटोले हे एक तडफदार नेते म्हणुन विख्यात आहे आता काही महीण्यापुर्वीच त्यांनी कॉग्रेस चा हात धरला व भाजपा ला राम राम ठोकला 

आज अचानकपणे त्यांनी पक्ष मजबुतनिकरणाच्या दृष्टीने शेगाव येथील कॉग्रेस कार्यकर्ता दिपक सलामपुरीया यांची भेट घेवुन त्यांना पक्षाची मजबुतिकरण कसे होईल या विषयावर चर्चा केली
यावेळी मतदार संघ नेते रामविजय बुरुंगले, दयाराम वानखडे ,पवन पचेरवाल यांची उपस्थीती होती
सुरवातीला शेगाव कॉग्रेस पक्षाकडुन त्यांचे शाल ,श्रिफळ देवुन स्वागत करण्यात आले
आमच्या प्रतिनिधी ने त्यांना आपन भाजप का सोडली हा प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली की मोदी सरकारने जी आश्वासन दिलीत व शेतकऱ्यांना अच्छे दिनची ग्वाही दिली सोबत एक नविन भरता ची निर्मिती करू असे स्वप्न दाखवली हे सर्व करतांना ते देशाचे नुकसान करीत आहे देशाला नरकात नेत आहेत असे ते म्हणाले सोबत मुख्यमंत्री यांना सुद्धा बोलतांना म्हणालेकी शेतकऱ्याच्या हित साठी त्यांनी काही ठोस निर्णय घ्यायला पाहिजे होते?ते त्यांनी घेतले नाही याचा परिणाम आपण सर्व पाहतच आहात.
जे सरकार जनतेचे हीत जोपासत नसेल आशा सरकार सोबत मी राहू इच्छित नाही म्हणून भा.ज.प हा पक्ष सोडला.