अमेरिकेत विद्यार्थ्याने शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १७ ठार

408

फ्लोरिडा (अमेरिका) – येथील पार्कलॅण्डमधील ‘मार्जर स्टोनमॅन डगलस हायस्कूल’मधील निकोलस क्रूज या १९ वर्षीय विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला. यात १७ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 

यानंतर निकोलस क्रूज स्वतःहून पोलिसांना शरण आला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेविषयी ‘ट्विटर’वर खेद व्यक्त केला आहे. निकोलसला काही कारणामुळे शाळेतून काढण्यात आले होते.

जाहिरात