‘व्हॅलेंटाईन’ भारताला लागलेला कर्करोग – श्री सोपान कनेरकर >< टोम्पे महाविद्यालयात मातृपूजन कार्यक्रमाचे आयोजन

0
998
Google search engine
Google search engine

 

शिरजगाव बंड:- वैभव उमक-

आपली भारतीय संस्कृती अंगिकारण्यासाठी कितीही कठिन असली तरी ती आपली संस्कृती आहे. हा विरोध प्रेमाचा नसून, पाश्च्यात संस्कृतीचा आहे. आजची व्हॅलेंटाईन संस्कृती समाज निर्मितीचा मोठा अडसर असून आजच्या युवक युवतींना याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन युवा व्याख्याते सोपान कनेरकर यांनी टोम्पे महाविद्यालय चांदूरबाजार येथे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ‘मातृ पितृ पूजन दिवस’ या विषयावर जाहीर व्याख्यान प्रसंगी केले.

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार होय. विचार व कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारयुक्त असली पाहिजे. बाजारात सर्वकाही विकत मिळते; परंतु आशिर्वाद विकत मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात. वडिलधार्यांशी चांगले वागून त्यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी विद्यार्थांनी प्रयत्न केले पाहिजेत. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे. विद्यार्थी जीवनात शिक्षण हे साध्य नसून ते साधन आहे. ज्यातून नवचैतन्य, नवसंस्कृती आणि नवसमाज निर्माण करायची जबाबदारी आपल्यावर आहे. वाचनसंस्कार हा युवपिढीला तर अधिक परिपक्व करू शकतो परंतु काय वाचावे याचे योग्य मार्गदर्शन त्यांना होत नाही. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आज वाचन – संस्कृतीवर दूरदर्शन – संस्कृतिने जबरदस्त हल्ला केला आहे. मानवाच्या अनुकरणाप्रियता या गुणामुळेच संस्कारप्रसार होत असतो. संस्काराच्या पायऱ्या चढतचढतच माणुस आदर्शापर्यन्त पोचू शकतो. त्यामुळे घरातील संस्कारांची शिदोरी आजपासून आपल्या जवळ विद्यार्थ्यांना ठेवल्यात आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीच्या व जडणघडणीच्या थांब्यावर त्यांची मदत निश्चित होते. व्हॅलेंटाईन हा भारताला लागलेला कर्करोग आहे आणि त्याचा लवकर उपचार करणे आपल्या हातात आहे असे कनेरकर यावेळी म्हणाले.

यावेळी प्राचार्य राजेंद्र रामटेके, राजू शिंदे सर, प्रफुल चौधरी, कृनाल वेरुळकर, शिर्के मॅडम, देशमुख मॅडम, उभरांडे सर, येवतीकर सर, कोल्हे सर, अडगोकार सर उपस्थित होते.

यावेळी कनेरकर पुढे म्हणाले की, माता पित्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय, याचे दाखले आपल्या हिंदू संस्कृतीत ठायी ठायी अढळून येतात. त्या विघ्नहर्त्या गजाननाची कथा सर्वकृत आहे. आई-वडिल-शंकर-पार्वती हेच एकमेव आपले विश्व, हेच आपले ब्रम्हांड हे सत्य आई-वडिलांना एक प्रदक्षिणा घालुन सिद्ध करणारा सिद्धिविनायक म्हणूनच जगात वंद्य ठरला.

श्रावण-बाळ! आपल्या अंध आणि वृद्ध माता-पित्याच्या सेवेसाठी त्यानं जिवाचं रान केलं. माता-पित्यांच्या श्रांत, तुझ देहाला आराम देण्यासाठी कावडी मधून आपल्या खांद्यावरुन त्यांना रानावनांतुन घेऊन जातांना त्याला परमानंद होत असे, कृतार्थता वाटत असे. आई-वडिलांचे त्याला कधीच ओझे वाटले नाही. त्यांच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर होता त्यांची तहान भागविण्यासाठी त्याला आपल्या जीवनांच मोलद्याव लागलं! असा आदर्शबाळ – श्रावणबळ पुन्हा होणे नाही !!

मर्यादा पुरुषोत्तम दशरथी राग ! प्रभुरामचंद्रांनी आपल्या पित्याच्या राजा दशरथाच्या वचनपूर्तीसाठी आणि कैकयी मातेच्या इच्छापूर्तीसाठी —– आज्ञा शब्द शिरोतार्थ ठेवुन बारा वर्षे वनवास स्विकारला! आई-वडिलांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारं असं पुरुषोत्तम व्यक्तीमत्व होणे नाही. मला कैकयी जरी सावत्र माता असली तरी माताही माताच असते, ती कधीच सावत्र नसते! माय- पित्याच्या आज्ञेचा, सेवेचा उचुंग अन् उल्लेखनीय मापदंड प्रभु रामरायानं जगासमोर ठेवला.

भक्त पुंडलिक ! आई-वडिलांची मनोभावे सेवा हीच ईश्वर सेवा हीच प्रभुसेवा – या शाश्रत संकल्पनेचा सर्वोत्तम उदाहरण. असा भक्त होणे नाही.

अज्ञा नानाविध कथांमधून आणि दाखल्यांतून आई-वडिलांची महती वर्णन करण्यास शब्द थिटे पडतात, वाणी अपुरी पडते माता पित्यांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. मनापासून आई-वडिलांची सेवा केल्यास, आपल्या हातून घडल्यास वेगळी भगवत् प्रसाद हीच ईश्वर सेवा होय, आई-वडिलांची सुयोग्य सेवा हीच ईश्वर प्राप्तीची गुरु किल्ली.

मुलांच्या मनांत, अंतरंगांत उत्तमोत्तम विचार रुजविण्याचे बिंबवण्याचे काम आई-वडिल निश्चितपणे करीत असतात. मनापासून केलेल्या गोष्टीला, उशिरा का होईना प्रतिसाद मिळतोच असा माझा अनुभव आहे.

वडीलधार्‍यांविषयी आदर, आई-वडिलांविषयी आपुलकी, प्रेम, थोरामोठ्यांची कदर, मानसन्मान , पूज्यभाव आधि पैलुंची जाण देण्याचे काम आई वडिलांनीच करावयाचे असते. नैतिक अधिष्ठानचा उगम माय-पित्यापासून होतो हे सत्य आहे, नाहीतर संत कबीराच्या ओव्या प्रमाणे

“बोया पेड बाबुल का, आम कहॉ से आया ”

अशी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही, उत्तमपेरा, उत्तम उगवेल यांत शंकाच नाही. सर्वांभूती ईश्वर पाहण्याची दृष्टी थोडीफार का होईना देतां आली तरी खूप झाले अशा तर्‍हेचे “सामाजिक व्हॅलेंटाईन डे” वरचेवर साजरे झाल्यास समाज उभारण्यास हातभार लागेलच.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण अहिर, वैभव इंगळे, शब्बीर हुसेन, ऋषी सायंदे, रुपेश शिरभाते, आकाश गजभिये, यश कारिया , मंथन गणोरकर, शुभम तायडे, मयूर दिवे, पावन भल्लवी , अनिकेत घायर, सुरज अहिर, ऋषिकेश जोशी यांनी परिश्रम घेतले.