संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्वच्छतेविषयी विचार आत्मसात करा – नगरसेविका सौ. स्वाती मेटे

0
820
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
 वंदनीय संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कीर्तनातून व भजनातून समाज जागृती करून ग्रामसफाईचा संदेश दिला. अशा या संत महापुरुषांचे विचार सर्वांनी आत्मसात करायला हवे, जेणेकरून सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा, पाणी वापरा संबंधी काटकसर करावी तसेच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाडीत टाकावे असे आवाहन नगरसेविका सौ. स्वाती शैलेंद्र मेटे यांनी पात्रीकर कॉलनी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्य आयोजीत भागवत कथेच्या समारोपीय कार्यक्रमात केले.
       स्थानिक प्रभाग क्रमांक 7 पात्रीकर कॉलनी येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्य श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ह भ प धोंडुपंत दुधाने महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा संपन्न झाली. सदर कार्यक्रमात श्री संत योगिराज माऊली, गोपाल नगर अमरावती यांचा ‘दर्शन सोहळा’ आयोजित केला असता अनेकांनी संत दर्शनाचा लाभ घेतला. याप्रसंगी ह. भ. प. धोंडू महाराज यांचे काल्याचे किर्तन होवून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. यानंतर ह. भ. प. धोंडू महाराज, भजनी मंडळी एकपाळा व डॉ. पंजाबराव मेटे यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन रविंद्र काळमेघ, बंडूभाऊ यादव, शरद झाडे, सौ. स्वाती मेटे यांच्यासह परीसरातील नागरीकांनी केले होते.
     या संपुर्ण कार्यक्रमात पुरूष, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. कडुकार यांनी केले.