पत्नी सोबत  दोन मुलींची हत्या करुन पतीची आर्थिक कारणावरुन आत्महत्या

0
785

पुणे :

आपल्या पत्नी सोबत  दोन मुलींची हत्या करुन पतीने आर्थिक कारणावरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे येथील शिवणे उत्तमनगर भागात घडली प्लास्टिक मोल्डिंग व्यावसायिकाने वय 39 वर्षीय निलेश चौधरी यांनी कर्जबाजारीपणातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

पोलिसांना आज शनिवारी सकाळी 10 वाजता या घटनेची माहिती मिळाली. 7 वर्षीय श्रिया, 10 वर्षीय श्रावणी आणि 31 वर्षीय पत्नी नीलम यांचे मृतदेह बेडरुममध्ये, तर निलेश यांचा मृतदेह हॉलमध्ये पंख्याला दोरीने लटकलेल्या अवस्थेत सापडला. पत्नी आणि मोठी मुलगी श्रावणी यांच्या तोंडातून फेस येत होता.