*राष्ट्रीय हायस्कूल येथे छ.शिवाजी महाराज जयंती संपन्न*

0
705
Google search engine
Google search engine

अचलपूर:-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज देशात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात एका कार्यक्रमाचे माध्यमाने साजरी करण्यात आली.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद नैकेले प्रमुख अतिथी उपमुख्याध्यापक सुनिल झंवर पर्यवेक्षक ममता तीवारी यांचे हस्ते महाराजांच्या प्रतीमेचे पुजन व हारार्पन करण्यात आले.छ.शिवाजी महाराज यांचे जीवनावर विद्यार्थ्यांनी माहिती दिली.ममता तीवारी यांनी जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या बद्दल मार्गदर्शन केले तसेच अध्यक्षीय भाषणात प्रमोद नैकेले यांनी महाराजांच्या कुशल संघटक व प्रशासक म्हणून केलेल्या कर्तव्याची माहिती दिली कार्यक्रमाचे संचलन व आभार महेश शेरेकर यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.