लहुजी साळवे सशस्ञ क्रांतीचे प्रणेते- नगरसेवक श्री सुनिल मिरकर

0
933
Google search engine
Google search engine

सिल्लोड / संभाजी नगर – 

इंग्रजाच्या जोखंडातुन देशाला मुक्त करण्यासाठी आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे यानी क्रांतीकारकाना  सशस्ञअस्ञाचे प्रशिक्शन देऊन इंग्रजा विरूध्द लढा उभारून देशाला स्वातंञ मिळवून देणारे  लहुजी हेच खरे सशस्ञक्रांतीचे प्रणेते होय असे प्रतिपादन भाजपाचे नेते तथा नगरसेवक सुनिल मिरकर यानी विष्णुपंत साबळे प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजीत अभिवादन कार्यक्रमात  केले आहे.
आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे याच्या पुण्यतिथी निमित्त टिळकनगर भागातील लहुजी  साळवे चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्शस्थानी धर्म जागरण मंचचे जिल्हाध्यक्श मनोज मोरेल्लू हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन डाँ. गजेन्द आवारे,डाँ. आर एन झलवार,नगरसेवक सुनिल दुधे, भाजपा शहराध्यक्श मधुकर राऊत गंगाजलचे संपादक राजेश सराफ, नाट्यक्रमी राजु आठवले, प्रा. अनिल साबळे, सिताराम कांबळे संतोष शेलार,प्रकाश सोनवणे आदीची उपस्थिती होती.
> प्रारंभी लहुजी साळवे चौकास मान्यवराच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साबळे प्रतिष्ठाणचे डाँ.सचिन साबळे, किरण कांबळे, रतन अंभोरे, सतिश शेलार  प्रशांत साबळे, अनिल कांबळे, संजय जाधव, मंगेश पवार, रोहीत गायकवाड, गजानन आव्हाड आदीनी परीश्रम घेतले.