जे काँग्रेस शासनाला जमले नाही, ते आमच्या भाजप शासनाने करून दाखवले – खासदार श्री. रामदास तडस

0
953
Google search engine
Google search engine

रेल रोको कृती समिती व खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नाने दोन रेल्वे गाड्यांच्या थांब्याला मंजुरी

*चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)*

काँग्रेस शासनाच्या काळात स्वतः महामहिम राष्ट्रपतींनी इंटरसिटी एक्सप्रेस, जबलपुर एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांना अमरावती येथून प्रारंभ करण्याकरिता पुढाकार घेतला होता. परंतु मागील शासन काळात चांदुर रेल्वे स्थानकाला थांबा मंजूर न झाल्याने जनतेवर अन्याय होत होता. कुठलेही शासकीय काम करतांना एका मर्यादेत राहूनच पाठपुरावा करावा लागतो. थोडा वेळ झाला असला तरी काँग्रेस शासनाने चांदुर रेल्वे येथील जनतेवर केलेला अन्याय भारतीय जनता पक्षाने दूर करून आज खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे कार्य केलेले आहे. सोबतच जे काँग्रेस शासनाला जमले नाही ते आमच्या भाजप शासनाने करून दाखवले आहे असे मत खासदार श्री. रामदासजी तडस यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे व्यक्त केले.
गाडी नं. १२१५९ /१२१६० अमरावती जबलपूर अमरावती व  १२११९/१२१२० अजनी अमरावती इंटरसिटी एक्सप्रेस चा बहुप्रलंबित रेल्वे थांब्यांना चांदुर रेल्वे येथील रेल रोको कृती समिती व खासदार रामदास तडस* यांच्या प्रयत्नाने मंगळवारी मंजुरी प्रदान करण्यात आली असून दिनांक २६/०२/२०१८ पासून या दोन्ही प्रवासी रेल्वे गाड्या चांदुर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.  हा रेल्वे थांबा मंजूर करण्याकरिता खासदार रामदासजी तडस यांनी सातत्याने रेल्वे विभागाकडे अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला. रेल्वे मंत्री श्री. पीयूषजी गोयल, रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष श्री. अश्विनी लोहानी, महाप्रबन्धक मध्य रेल्वे यांची वेळोवेळी भेट घेऊन हा विषय प्रामुख्याने लावून धरला होता. तसेच शहरातील रेल रोको कृती समितीच्या वतीने सुध्दा रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्डात अनेक निवेदने दिली, आंदोलन सुध्दा केले होते.