*अचलपूरची पुर्वी झळकणार मोठ्या पडद्यावर*

0
973
Google search engine
Google search engine

अचलपूर:-

 

अचलपूर म्हणजे ऐतिहासिक,सांस्कृतिक,शैक्षणिक व राजकीय वारसा लाभलेला तालुका.येथून अनेक दिग्गज नेते,अभिनेते,लेखक,कवी,साहित्यिक व नाट्यकलावंत राज्याला तसेच देशाला दिले.अशीच एक चिमुकली पुर्वी बुरांडे लवकरच सिनेमाच्या मोठया पडद्यावर झळकरणार आहे.

 

अचलपूर शहरातील राजेश्वर नगरात राहणारे मूळचे सरमसपूरा विभागाचे रहिवासी मंगेश रमेश बुरांडे यांची अवघ्या सहा वर्षाची कन्या पुर्वी सुबोध हायस्कूल च्या काँन्व्हेंटची के.जी.व्दितीयची विद्यार्थीन एका मराठी चित्रपटात झळकणार आहे त्या चित्रपटाचे नाव आहे *अवनी एक संघर्ष* हा चित्रपट मार्च मध्ये चित्रपट गृहात येण्याची माहिती आहे.सँनरो फिल्म प्राँडक्शन निर्मित डाँ.संजय रोडगे निर्मित,नितीन कारखानिस लेखक,कथा,पटकथा,संवाद,गित व दिग्दर्शित अर्जून पवार सह दिग्दर्शक व कँमेरातून कृष्णा शरणागत यांनी छायाचित्रीत पवार स्टुडिओ च्या या चित्रपटात पुर्वी मंगेश बुरांडे ही अचलपूरची कन्या बालकलाकार म्हणून झळकणार आहे.या चित्रपटात पुर्वी ने एका मुस्लीम देशभक्त वैज्ञानीकाच्या आफा नावाचे मुस्लीम मुलीची भुमिका केली आहे. हा चित्रपट चालु घडामोडींवर बनवलेला असुन यामध्ये  शेतकरी आत्महत्या,हुंडाबंदी,मुलीची सुरक्षा,आतंकवाद, देशभक्ती,शिक्षण असे अनेक विषय घेऊन दिग्दर्शकाने उत्तम पद्धतीने चित्रपटाची निर्मीती केलेली असुन  चार गाणी आणि एक लावनी सुद्धा ह्या चित्रपटात आहे  चित्रपट तेरा मार्च रोजी प्रदर्शीत होऊ शकतो.असे तिचे वडिल मंगेश रमेश बुरांडे यांनी माहिती दिली.अचलपूरची कन्या चित्रपटात झळकणार म्हणून पुर्वी चे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे तसेच असे आणखी तिन चित्रपट पुर्वी ला भेटल्याची सुध्दा त्यांनी माहिती दिली.