प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन-आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा पुढाकार.

0
747
Google search engine
Google search engine

 

अमरावती : मोर्शी तालुक्यातील ३४ अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे ९ वर्षापूर्वी शासनाने मोर्शीत पुनर्वसन केले होते, परंतु पुनर्वसित धरणग्रस्तांचा उदरनिर्वाह सुरळीत चालवा यासाठी सन २००८-२००९ वर्षापासून शेतजमीन वाहीपेरी करिता दिली होती, आणि सध्या पण आहे. परंतु याच जमिनीबद्दल शासनाने अतिक्रमणाच्या केसेस दाखल करून गुन्हे दाखल केले आहेत असे गुन्हे मागे द्यावे, व शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा यासाठी आज गुरुवार २२ फेब्रुवारी २०१८ रोजी मोर्शी – वरुड मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मौजा नशीरपूर येथील अप्परवर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनातून मागणी केली आहे.
शासकीय कार्यालयात स्वत:च्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षापासून मोर्शी तालुक्यातील मौजा नशीरपूर येथील प्रकल्प ग्रस्त शेतकरी चक्कर मारीत आहे, परंतु अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, उलट शासनाने प्रकल्प ग्रस्तांना तोगडी मदत देऊन मनसमाधानी केले असल्याचा प्रकार उघड झाला आहे, नशीरपूर परीसरातील ३४ शेतकरी कुटुंबांचे मोर्शीत पुनर्वसन केले असले तरी जमीन मात्र शासन नियमानुसार ८ किलोमीटरच्या आत द्यायला पाहिजे ती अद्यापपर्यंत देण्यात आली नाही.

 

शेतकऱ्यांचे पुनर्वसन मोर्शी झाले तरी त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालवा याकरिता ३४ धरणग्रस्तांना वाहीपेरी करिता जमीन सन २००८-२००९ वर्षापासून शासनाने दिलेली आहे. परंतु याच जमिनीबद्दल शासनाने अतिक्रमणाच्या केसेस दाखल केली असल्याचा प्रकार निवेदनातून उघड झाला आहे. ९ वर्षापासून ३४ धरणग्रस्त शेतकऱ्यांना वाहीपेरीकरिता दिलेली जमीन हि शासनाने कुणालाही देऊ नये. आम्ही १०० टक्के धरणग्रस्त असून या प्रकल्पामध्ये आमचे घर व शेती सुद्धा गेली असून आम्ही उद्योगमुक्त झालो आहे, या शेतीवर आमचाच हक्क असल्याने आम्ही सर्व शेतकरी शासनाच्या नियमानुसार पैसे भरण्यास इच्छुक असल्याचे हि अप्परवर्धा धरणग्रस्त शेतकरी बहुउद्देशीय संस्थेच्या निवेदनातून म्हटले आहे.
यावेळी मोर्शी तालुक्याचे धरणग्रस्त रामदास पुरी, महादेव वाघमारे, भास्करराव दवंडे, नामदेव दवंडे, श्रीमती निर्मलाबाई खाडे, श्रीमती सुशीलाबाई देशमुख, श्रीमती राजूस चौधरी, बाबाराव मायतकर, विठ्ठल वाघमारे, प्रल्हाद वानखडे, सुनील दवंडे, रामदास महल्ले, दादाराव भूबंर, श्रीमती चंद्रकला श्रीखंडे, नत्थुजी झरवडे, केशवराव माकोडे, सुधाकर माकोडे, अमोल विघडे, रुपरावजी विरूळकर, हरिहर चौधरी, श्रीमती जिजाबाई चौधरी, प्रकाश गायकवाड, सुधाकर वरठी, साहेबराव वाघमारे, बाबाराव चौधरी, मधुकर चौधरी, बापूराव भोप्ते, अशोक वाघमारे, कैलास चौधरी, जयवंत चौधरी, संकेत कुरवाडे, दामोदर झरबडे, बबन केवतकर, रंगरावजी ठाकरे यांच्यासह अन्य धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.