शिवजयंती निमित्त टोंगलाबाद येथे 51 तरुणांनी केले रक्तदान – ग्राम स्वच्छता अभियान राबवुन शिवजयंती साजरी

0
621
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे:- (शहेजाद खान )
चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद येथे तरुणांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. शिवाजी महाराजांचे आदर्श समोर ठेऊन गावातील तरुणांनी एकत्र येऊन एक अनोखी संकल्पना मांडली व रक्तदान करण्याचा संकल्प केला. शिवजयंतीचे औचित्त्य साधून गावातील 51 तरुणांनी रक्तदान करून शिवजयंती साजरी केली. या वेळी विनोबा भावे सावंगी मेघे हॉस्पिटल येथील चमू उपस्थित होते. .
            सोबतच आपले गाव स्वच्छ व्हावे यासाठी सकाळी ग्राम स्वच्छता अभियान राबवुन साफ सफाई करण्यात आली. या मध्ये गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविला.
        यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पण करण्यात आले व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नांदगाव पोलीस स्टेशनच्या पी एस आय अंभोरे,  तरुण कार्यकर्ते आशिष चौधरी, अँड अमोल बावनकूले. पो.पा. उमेश निस्ताने, रामेश्वर मारोटकर, बंडु बावनकुळे, सुमेध गजभिये, आशुतोष ठाकरे. बाळू मारोटकर. हरीश चौधरी, सौरभ सातपैसे, हरिष सातपैसे, निलेश भांगे, अनुप समरीत,  गोकुल सातपैसे, अजय मोहुर्ले,  नितीन जुंभले, चेतन ठाकरे, मंथन चिंचापुरे. नंदू चौधरी, नारायण काळमेघ, निखिल काळे, रामेश्वर गावंडे,  राजुरा येथील राजुभाऊ निबर्ते, मोरेश्वरभाऊ राजुरकर, राहुल निबर्ते, भुषन काळे, अंकुश सहारे, शुभम बांडाबुचे, अमीत खाडे, पवन बोन्द्रे, धानोरा मोघल येथील सागर झाकर्डे, उमेश काळमेघव
 व गावातील युवक व गावकरी उपस्थित होते.