अभिनेत्री श्रीदेवीला माणुसकी संस्थेची श्रध्दांजली..

0
1294
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
माणुसकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पद्मश्री पुरस्कार प्राप्त स्वर्गीय अभिनेत्री श्रीदेवी यांची रांगोळी कलाकृती रेखाटुन आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कला शिक्षक श्री.उज्वल पंडेकर यांनी रांगोळी कलेतुन श्रीदेवीचे चित्र रेखाटुन नावीन्यपूर्ण कलाकृतीतून कलावंत या नात्याने “एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराने वाहिलेली श्रध्दांजली.
ही कलाकृती शहरवासीयांना पाहण्या करीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, नगर परिषद समोर चांदूर रेल्वे येथे आहे. तरी सर्वांनी सदर कलाकृतीला भेट द्यावी असे आवाहन माणुसकी संस्थेचे अध्यक्ष प्राविण्य देशमुख यांनी केले.
श्रध्दांजली च्या कार्यक्रमात कला शिक्षक इंगोले सर,भूषण सरदार,प्रतिक राय,राहुल जगताप,अमर घटारे,दिनेश वाघाडे,अक्षय ठोंबरे,सारंग देशमुख,नगर सेवक गोटु गायकवाड,दिनेश कातोरे,विजय पवार,किरण कातोरे,मुकेश पाटील,संतोष वाघ आदि सर्व सदस्य उपस्थित होते…