अमरावती येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने शिवटेकडीवर महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक संपन्न

0
1490
Google search engine
Google search engine

अमरावती—  अखंड  हिंदुस्थानचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या  जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे अमरावती येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने ४ मार्च रोजी शिवटेकडीवर महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक साताऱ्याचे यजमान श्री. ऋषिकेश भोसले यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी तेथे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे धारकरी, भगवे राज प्रतिष्ठान, नमुना मित्र मंडळ, हिंदु जनजागृती समिती, हिंदु हेल्प लाईन, राजकीय पक्ष, हिंदुत्वादी संघटना, शिवप्रेमी, व महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेनचे शहर प्रमुख श्री. नरेंद्र केवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. बादल कुलकर्णी श्री. तुषार वानखडे, सौ. कांचनताई ठाकूर हे सुद्धा उपस्थित होते.

यानंतर लगेच शिवटेकडी ते अंबादेवीच्या मंदिरापर्यंत  महाराजांची पालखी काढण्यात आली होती. पालखी मधे काही शिवप्रेमींनी मावळ्यांची वेशभूषा धारण केली होती, महाराजांचे पोवाळे व घोषणा देत पालखी समोर जात असतांना अनेक शिवप्रेमींनी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. राजकमल चौक येथे श्री. अजय सारस्कर, श्री. प्रवीण अन्ना डाके, सौ. नविनाताई हर्षे, यांनी महाराजांच्या मूर्तीला पुष्प व हारार्पण केलेत. अंबादेवी व एकविरा देवीच्या मंदिरामधे महाराजांची पालखी नेऊन सौ. स्वातीताई शेखरजी कुलकर्णी  यांच्या हस्ते आरती करून देवीच्या कृपा आशीर्वादाने नमुना मधील हनुमान मंदिरामधे सांगता करण्यात आली. भगवे राज प्रतिष्ठान, नमुना मित्र मंडलाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी शिवप्रेमींसाठी न्याहारी ची व्यवस्था केली होती.

तसेच   धर्मवीर श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या वतीने संभाजी महाराजांच्या चरित्रावर व्याखान १७ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता राजापेठ चौकात ठेवण्यात आले आहे, नंतर लगेच सायंकाळी 7 वाजता  राजापेठ चौक बसस्थानकवरून मुकपदयात्रेचे  नियोजन केले आहे. असे निमंत्रण धारकरींनी सर्व उपस्थितांना दिले.

या शिवजयंती महोत्सवाचे संपूर्ण आयोजन शिवतपस्वी गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या  श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे धारकरी महेश लढके, मनोज विश्वकर्मा, करण धोटे, शशांक जोशी, रोशन मुळे, निषाद जोध, दीपक येलगलवार, तपेश हम्बर्डे, ऋषिकेश भोकरे, गौरव देसाई, अमित गायकवाड, रोशन चौव्हाण,चैतन्य उपाध्ये, भूषण गायकवाड, प्रथमेश पाटणे, अखिल ठाकरे, गौरव पंचवटे, सुमंगल खत्री, अभी टावरे, राजा सोळंके,    प्रतीक्षा धोटे, शोभा धोटे, वृंदा मुक्तेवार, पूनम तांबट, अनुजा तांबट, दीपा धामणकर रेश्मा शेलोडे, मंदा झराळे, वसू चौकरे, अनिता येलगलवार  आदि यांनी केलेत.