“युवकांच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प”:-आकाश सातपुते(अभाविप अचलपूर)

0
623

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले/-
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या द्वारे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०१८-१९ आज विधानसभेत मांडण्यात आला यात विशेषता युवक,शेतकरी,ग्रामीण जनता,उद्योग,रोजगरनिर्मिती,कौशल्य विकास,शेतीचा शाश्वत विकास,मागसवर्गीय या सर्व क्षेत्राचा समतोल राखनारा हा अर्थसंकल्प होता,
या अर्थसंकल्पा मध्ये युवकांचा विचार करता स्पर्धा परीक्षेच्या निकालाचा टप्पा वाढवन्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र उभरण्या साठी ५० कोटि रु ची तरतूद करण्यात आली असून हे गरजू होतकरु विद्यार्थ्याना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने उचलले उत्तम पाउल आहे.
तसेच आज कौशल्य विकास हे महत्वपूर्ण झाले असून त्यातून अनेक रोजगार संधी उपलब्ध होत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळावा या दृष्टीने महाराष्ट्रात खाजगी सहाभागतुन ६ कौशल्य विद्यापीठ राज्यभरात स्थापन करून त्याद्वारे विद्यार्थ्याना कौशल्य विकासाच्या धडे देण्याच्या दृष्टीने हे एक उत्तम पाऊल असून निश्चितच स्वागतार्ह आहे,तसेच मानव विकास मिशन साठी ३५० कोटि रु तर राजश्री शाहू महारज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत उत्पन्न मर्यादा वाढवून ६ लाख रु वरून ८ लाख रु करण्यात आले असून यातील अटी व शर्ती शिथिल करण्यात आले आहे त्यामुळे निश्चितच या योजनेचा लाभ होतकरु विद्यार्थ्याना मिळेल, विद्यावेतन २ हजार वाढवून आता ४ हजार रु करण्यात आले आहे,युवकांच्या रोजगाराचा विचार करता राज्यातील व विशेषता विदर्भातील युवकांसाठी मिहान हा राज्य शासनाला महत्वाकांक्षी प्रकल्प असून या करीता ४००० कोटि रु च्या तरतूद केलि असून याद्वारे १४४७५ रोजगार निर्मितीचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.शेतीचा विचार करता शेतीला बाजारपेठ उपलब्ध करून देने हे अत्यंत महत्वाचे आहे व त्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या माध्यमातून मालवाहतुकीचा विचार राज्य शासन करत आहे त्यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांना बाजार पेठ उपलब्ध होईल व यातून ते आपला माल थेट बाजारपेठेत नेतील हे सुद्धा स्वागतार्ह आहे,तसेच शेतमालावर प्रक्रिया यासाठी ५० कोटी तर ४० लाख शेतकऱ्यांना दिवसा १२ तास विज देण्याचा विचार करण्यात आला असून संत्रा पिक घेणाऱ्या नागपुर,अमरावती,अकोला जिल्ह्यातील संत्रा शेतीचे उत्पादन वाढवण्याचा दृष्टीने योजना अखण्यात आली आहे व निचितच् हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून युवकांचा विकासाला चालना देणारा आहे.