*अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने 51 रणरागीनींचा गौरव*

496
जाहिरात

बीड :(परळी वैजनाथ )
नितीन ढाकणे / दीपक गित्ते-

जागतीक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने संगम येथे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्या 51 महिलांचा गौरव करण्यात आला. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातील सत्काराने अनेकजणी भारावून गेल्या. संगम सारख्या एखाद्या छोट्याश्या गावात एवढा भव्य कार्यक्रम घेण्याची ही बहुदा जिल्ह्यातील पहिलीच वेळ असावी, आम्ही या कार्यक्रमाने भारवून गेलो असून, वारकरी मंडळाच्या सत्काराचे आम्ही कायम ऋणी राहू अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई फड यांनी व्यक्त केली.

अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे
यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम संगम येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात रा.कॉं.महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा
सौ.रेखाताई फड, सौ.सुरेखाताई मेनकुदळे, डॉ.दैवशाला घुगे, सौ.स्वाती ताटे, सौ.सुमनताई देशमुख, सौ.प्रेमा बाहेती, सौ.गोदावरी मुंडे, राधिकाताई जायभाये, ऍड.शुभांगी गित्ते, पोलिस सुरेखाताई पवार, सुनिता नरंगलकर, सौ.शोभाताई चाटे, शिल्पाताई मुकलवार, चंद्रकला लाड, संजीवनीताई ढोपरे, सौ.सुजता फुटके, सौ.उर्मिला मुंडे, सौ.संगिता चव्हाण, रंजनाताई साबळे, शिल्पाताई शिंदे, निर्मलाताई जोशी, कमलाबाई दहातोंडे, वर्षा कोकाटे,प्रेमाताई गिराम, स्नेहलता गिराम, सुभद्रा मुंडे यांच्यासह 51 महिला
रणरागीनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांचे, प्रमुख अतिथींचे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त संगम ग्रामस्थांच्या वतीने मोठे परिश्रम घेण्यात आले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।