रेल रोको कृती समितीने केला पत्रकार संघटनेचा सत्कार

0
1019
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (विशेष प्रतिनिधी ) –
    शहरात एकाच दिवशी २ रेल्वे थांबा मिळाला. हा थांबा मिळावा यासाठी वृत्तपत्रांतुन स्थानिक पत्रकारांनी चांगले लिखान करून रेल रोको कृती समितीला सहकार्य केले. यामुळे अखिल भारतीय भारतीय पत्रकार संघटनेचा सत्कार खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्काराचे आयोजन रेल रोको कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते.
    रविवारी रेल रोको कृती समितीतर्फे स्थानिक जुना मोटार स्टँड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक मदन कोठारी होते. तसेच प्रमुख पाहुने म्हणुन माजी आमदार अरूण अडसड, रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन,डॉ. क्रांतिसागर ढोले, कॉ. विनोद जोशी, बंडुभाऊ यादव, रामदास कारमोरे, प्रा. विजय रोडगे, प्रताप अडसड आदींची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती खासदार रामदास तडस होते. खा. तडस यांच्या सत्कारानंतर अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचा सुध्दा सत्कार यावेळी करण्यात आला. खा. रामदास तडस यांनी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांचा शाल, श्रीफळ व हार घालुन सत्कार केला. अध्यक्षीय भाषणातुन मदन कोठारी यांनी म्हटले की, रेल्वे थांब्यामध्ये स्थानिक पत्रकारांचा मोठा मोलाचा वाटा आहे. आज चांदूरचे पत्रकार खुप समोर गेले आहे. ते शहरातील प्रत्येक समस्येला बेधडकपणे वाचा फोडत असुन अभिनंदनास पात्र असल्याचेही म्हटले. यानंतर सत्काराला उत्तर देतांना पत्रकार प्रा. रविंद्र मेंढे यांनी सर्वप्रथम रेले रोको कृती समितीचे आभार व्यक्त केले. तसेच खासदार रामदास यांना शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने एखादा उद्योग शहरात येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या सत्कार समारंभाच्यावेळी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेचे प्रभाकरराव भगोले, उत्तमराव गावंडे, विदर्भ कार्याध्यक्ष युसुफ खान, तालुकाध्यक्ष प्रविण शर्मा, प्रा. रविंद्र मेंढे, अमोल गवळी, बाळासाहेब सोरगिवकर, विवेक राऊत, संजय मोटवानी, अभिजीत तिवारी, इरफान पठान, राजेश सराफी, अमर घटारे, मंगेश बोबडे, मनिष खुने, शहेजाद खान आदींची उपस्थिती होती.