*परळी येथील दैठणाघाट येथे चोरी-मोठ्या प्रमाणामध्ये ऐवज व मुद्देमाल लंपास*

0
685
Google search engine
Google search engine

बीड: परळी- वै.
प्रतिनिधी:- दिपक गित्ते व नितीन ढाकणे /-

तालुक्यातील मोठ्याप्रमाणात लोकसंख्या असलेल्या दैठणाघाट येथे काल दि. १५-०३-२०१८ मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की परळी तालुक्यातील दैठणाघाट येथे मध्यरात्री २ वा. सुमारास चोरांनी प्रल्हाद बाबुराव मुंडे यांच्या घरी चोरी केली. प्रल्हाद मुंडे हे गावातील शाळेमध्ये सेवक असल्यामुळे ते शाळेत झोपण्यासाठी गेले होते व घरी वयोवृद्ध वडील असल्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरांनी घराच्या मागच्या बाजूने आत प्रवेश केला. घरातील कपाट लॉक केलेले नव्हते व त्याच्या चाव्या या कपाटातच होत्या त्यामुळे त्यांना चोरी करणे सोपे झाले व यामध्ये चोरांनी २ ग्राम सोन्याची अंगठी, १ तोळ्यांची चैन , नगदी रोख ६०,००० रुपये असा मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास केला . प्रल्हाद मुंडे हे परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यासाठी आले असता अधिकारी हजार नसल्या कारनाणे कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे दि. १६-०३-२०१८ दुपारपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.