*रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी रेल्वे महाव्यवस्थापकांना परळी रेल्वे संघर्ष समितीचे निवेदन-मछली पट्टनम-बिदर रेल्वे परळीपर्यंत विस्ताराची मागणी*

0
987
Google search engine
Google search engine

बीड : परळी वैजनाथ
नितीन ढाकणे / दिपक गित्ते-

परळी- 12749/12750 मछली पट्टनम-बिदर-मछली पट्टनम ही जलद रेल्वे सेवा परळीपर्यंत विस्तारीत करण्याबाबतचे निवेदन परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतिने,रेल्वेच्या हैद्राबाद येथील मुख्यालयात रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना सादर करण्यात आले आहे. दरम्यान नांदेड-पनवेल गाडी आठवड्यातील प्रत्येक दिवशी सोडावी, पाटणा-पूर्णा साप्ताहिक रेल्वे परभणी-परळी वैजनाथ-लातूर-मिरज मार्गे मडगाव-गोवा पर्यंत वाढवावी, हैद्राबाद-बिदर इंटरसिटी एक्सप्रेसला परळीपर्यंत विस्तारीत करावे आदी मागण्यांचाही या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे परळी ते खानापुर जंक्शनपर्यंतचा भाग नांदेड विभागाशी जोडण्याची मागणी करण्यात आली. रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक प्रसुन्न चक्रवर्ती, सिनियर डिसीएम सुमित शर्मा, सिकंदराबाद विभागाचे डीआरएम अमित वारदान यांना 13 मार्च रोजी
परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतिने विविध मागण्यांचे निवेदन सादरकरण्यात आले. प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे, मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, एकमतचे प्रतिनिधी ओमप्रकाश बुरांडे, डॉ.बालासाहेब भोसले ,उदगीरचे डीआरयुसीचे मेंबर मोतीलाल डोईजोडे, हैद्राबादचे अनवर पटेल यांच्या शिष्टमंडळाने रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांना देण्यात आलेल्या

*निवेदनात प्रामुख्याने*
मछलीपट्टनम-बिदर ही रेल्वे परळीपर्यंत विस्तारीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बीडच्या संसद सदस्या डॉ.सौ.प्रीतमताई मुंडे यांनी सदर रेल्वे परळीपर्यंत विस्तारीत करण्याची आग्रही मागणी करणारे निवेदन रेल्वेमंत्री ना.पियुष गोयल यांना दिले असून त्यांचे शिफारसपत्र या शिष्टमंडळाने महाव्यवस्थापकांना सादर केले. दरम्यान यावेळी नांदेड-पनवेल आठवड्यातील सात दिवस चालू ठेवा, या रेल्वेला गंगाखेड, बार्शी सह अन्य थांबे देण्यात यावेत, पाटणा-पूर्णा तसेच हैद्राबाद-बिदर इंटरसिटी एक्सप्रेस परळीपर्यंत विस्तारीत करावी, पूर्णा -परळी पॅसेंजर लातूर रोड पयंर्त वाढवावी, परळी येथील आरक्षण केंद्राच्या कालावधीत आणखी वाढ करून आरक्षण कक्ष किमान 16 तास चालू ठेवावा, परळी रेल्वे स्थानकाला आदर्श रेल्वे स्थानकाचा दर्जा देवून
सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, वृद्ध, आजारी व दिव्यांग व्यक्तींना रेल्वेलाईन ओलांडण्यासाठी रॅम्प बांधवा,आणखी एक फुट ओव्हरब्रिज बांंधावा,
स्वंयचलित सरकते जीने बसवावेत, प्लॅटफॉर्म सहज पाण्याने धुण्यायोग्य करावेत, आदीं मागण्या यावेळी करण्यात आल्या. या निवेदनावर बासीतभाई,
आर.के.अग्रवाल आदींच्या सह्या आहेत.