आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने सेवानिवृत्ती वय ६० वरून ६५ वर्षे. – मंत्री पंकजाताई मुंडे कडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलासा

0
768
Google search engine
Google search engine

अमरावती : अंगणवाडी कर्मचारी ह्या बालगोपालांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे कसे राहता येईल, त्यासोबतच त्यांना उच्च शिक्षित कसे करता येईल, याविषयाच्या अनुषंगाने स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारी महिला म्हणजे आमची अंगणवाडी कर्मचारी शिक्षिका होय. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६५ वर्षे कायम ठेवण्यासाठी मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री मा.ना.श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे निवेदन सादर करून पाठपुरावा केला. आमदारांच्या निवेदनाला ग्राह्य धरून राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षा ऐवजी ६५ वर्ष करण्याला अनुमती दिली आहे. परंतु नवीन भरती होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय मर्यादा ६० करण्यात यावी असे ही निवेदनात नमूद आहे, या निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी / बालवाडी कर्मचारी संघटनाच्या, (आयटक) पदाधिकारी व कर्मचारी यांनी आमदार डॉ.अनिल बोंडे यांचे आभार व्यक्त केले.