*परळीला जिल्ह्याचा दर्जा देण्याबाबत प्राधान्य देवू – मुख्यमंत्री*

0
1131
Google search engine
Google search engine

*परळी जिल्हा निर्मिती नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन*

————–

बीड: परळी वैजनाथ
नितीन ढाकणे

राज्यात नव्या जिल्हा निर्मितीच्या वेळी परळीला प्राधान्य देणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.21) मुंबईत परळीतून गेलेल्या शिष्टमंडळाला दिले.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जिल्हा निर्मिती नागरी कृती समितीचे निमंत्रक दत्ताप्पा इटके, अध्यक्ष राजेश देशमुख, कार्याध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी (ता.21) मुंबईत विधानभवनातील दालनात दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी श्री फडणवीस यांनी हे आश्वासन दिले. जिल्हा निर्मिती नागरी कृती समितीचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी या भेटीवेळी प्रास्ताविक करून परळी बीड जिल्ह्यातील शेवटच्या टोकाचे शहर आहे. परळीहून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे होते, त्यामुळे बीड जिल्ह्याचे विभाजन करून परळी शहराला जिल्हयाचा दर्जा द्यावा, परळी हे तीर्थक्षेत्र, औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे मोठे औद्योगिक क्षेत्र, रेल्वे जंक्शन आहे, येथे विविध शासकीय कार्यालय आहेत. जिल्ह्यासाठी लाणार्‍या सर्व सेवा सुविधा या शहरात असल्यामुळे राज्यात नवीन जिल्हा निर्मितीवेळी परळीला प्राधान्य द्यावे अशी मागणी आपल्या प्रास्ताविकात श्री देशमुख यांनी यावेळी केली. शिष्टमंडळात प्रा.अतुल दुबे, डॉ.मधुसूदन काळे, डॉ.शालीनी कराड, डॉ.हरिश्चंद्र वंगे, धम्मानंद मुंडे, बाजीराव धर्माधिकारी, जुगलकिशोर लोहिया, माउली फड आदींनी यावेळी जिल्हा निर्मितीबाबत मुद्देसूद म्हणणे मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत शिष्टमंडळातील सर्वांचे म्हणणे ऐकून घेवून जिल्हा निर्मितीसाठी लागणार्‍या महत्वाच्या बाबीत परळीची बाजू भक्कम आहे, परळीचा जिल्हा निर्मितीसाठी प्राधान्याने विचार करू, जिल्हा विभाजन व निर्मितीसाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीपुढेही आपण स्वतःहा परळीची बाजू मांडू असे आश्वासन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला दिले. जिल्हा निर्मितीचा प्रश्न अतिशय मुद्देसूदपणे मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परळीच्या नेत्यांचे कौतुक केले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, श्री देशमुख, श्री धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना यावेळी परळीला जिल्हयाचा दर्जा देण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. दरम्यान या शिष्टमंडळाने राजभवनात जावून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेतली. यावेळीही राज्यपालांना परळी जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी परळी जिल्ह्याच्या मागणीची सरकारकडे शिफारस करण्याची विनंतीही यावेळी उपस्थितांनी राज्यपालांकडे केली. राज्यपालांनीही या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. या शिष्टमंडळात आयुब पठाण, वैजनाथ जगतकर, डॉ.सुर्यकांत मुंडे, अ‍ॅड.राजेश्वर देशमुख, विकासराव डुबे, सय्यद बहादूर, चेतन सौंदळे, डॉ.अजय मुंडे, अनंत इंगळे, प्रा.पवन मुंडे, सुरेश टाक, प्रा.दासू वाघमारे, शिवाजीराव गुट्टे, प्रकाश जोशी, डॉ. विवेक दंडे, शेख अब्दुल करीम, अरूण पाठक, विजय भोयटे, शंकर आडेपवार, शंकर कापसे, डॉ. भारत घोडके, योगेश पांडकर, सुभाष सावंत, नितीन समशेट्टी, मोहन जोशी, वैजनाथ कळसकर, अनिल आष्टेकर, सचिन गित्ते, दिलीप कराड, भीमराव सातपुते, आशिष अग्रवाल, संजय फड, नरेश पिंपळे, पवन मोदाणी, सुनील मस्के, एतेशाम खतीब आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाही परळी जिल्हा निर्मितीचे निवेदन सादर केले.