■जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात प्रा. टी. पी.मुंडे सर यांच्या सत्काराचे आयोजन- प्राचार्य डॉ.बी.डी. मुंडे

0
1059
Google search engine
Google search engine

 

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन.

बीड: परळी वैजनाथ
नितीन ढाकणे

परळी वै. – अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणी सद्यस्य म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा संस्थेचे अध्यक्ष प्रा. टी. पी.मुंडे यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे औचित्य साधून जवाहरलाल नेहरू कला,वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व नियामक मंडळ सदस्य व प्रदयाक, कर्मचारी यांनी सत्काराचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11 वा. शुक्रवार रोजी महाविद्यालयात करण्यात येनार आहे.
प्रा. टी. पी.मुंडे यांची निवड दिल्ली येथे झालेल्या 17 मार्च 2018 राष्ट्रीय काँग्रेस च्या महा आधीवेषांमध्ये झाली राष्ट्रीय कार्यकारणीवर काम करण्याचा बहुमान मराठवाड्यातून प्रा. टी. पी.मुंडे यांना मिळाला असून या पूर्वी प्रा. टी. पी.मुंडे यांनी कॉंग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस , परभणी व लातूर जिल्ह्याचे तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे ग्रामीण प्रभारी म्हणून काँग्रेस पक्षाच्या मधेमातून दलित,अल्पसंखांक, युवक, व्यापारी, महिला यांच्या विकासासाठी प्रा. टी. पी.मुंडे नेहमीच संघर्षशील असतात यांच्या कार्याची दखल घेऊन घेऊन राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश प्रदेश अध्यक्ष तथा खासदार अशोक रावजी चव्हाण यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी दिली या निवडीचे सर्व स्तरातून जोरदार स्वागत होत असून या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला योग्य न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे