वरुड येथे पाणी फाउंडेशन ची नियोजन सभा उत्साहात संपन्न – पाणी फाउंडेशनच्या ,नियोजन सभेत डॉ अविनाश पोळ व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले मार्गदर्शन

0
954
Google search engine
Google search engine

गावकऱ्यांनी केला गाव पाणीदार करण्याचा संकल्प !

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

वरुड येथे पाणीफाऊंडेशनच्या नियोजन सभेत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांची व गावकऱ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना त्यांनी केलेल्या उपाय योजनेचा आढावा घेतला यावेळी गावातील प्रशिक्षणार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले शास्ञ सोडून काम करु नये असे डॉ अविनाश पोळ यांनी सांगितले सुरूवातीला थोर नेत्यांचे पुजन व जलपुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली

पाणी वाचविण्यासाठी सामुहिक शपथ घेण्यात आली यावेळी शोषखड्डयासाठी तहसीलदार आणी बिडिओ यांनी अत्यावश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन द्यावी असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले ते म्हणाले कि शेततळे घेण्याची तयारी असावी शासन सहकार्य करेल तसेच वनजमिनिवर कोणालाहि श्रमदान करुन जलसंधारणाचे कामे करता येईल असे हि जिल्हाधिकारी म्हणाले यावेळी वॆयक्तिक शोषखड्डयांना प्राधान्य द्या असे डॉ अविनाश पोळ म्हणाले ,शेततळ्याचे काम करतांना शासन सर्वतोपरी मदत करेल गाळमुक्तधरण अभियानाला ३लाखापर्यत टेन्डर ची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर म्हणाले यावेळी वनजमिनिवर जलसंधारणाचे कामे करतांना वनविभागाला सोबत घेऊन कामे करावी असे हि जिल्हाधिकारी म्हणाले ,नियोजन सभेत अनेकांनी प्रश्न विचारले त्यांचे समाधान डॉ अविनाश पोळ व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले लोक जर जनसहभागातुन कामे करीत असेल तर शासकीय अधिका-यांनी जलसंधारणाचे कामात सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले जे अधिकारी सहकार्य करणार नाही त्यांची दखल आम्ही घेऊ असे हि जिल्हाधिकारी म्हणाले तक्रारी असतील पण चिकाटी सोडू नका प्रथम मनसंधारण करा व मग जलसंधारण करा असा सल्ला यावेळी डॉ अविनाश पोळ यांनी दिला वाटरकपची तयारी म्हणजे हि स्पर्धा आहे .

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेकर , उपजिल्हाधिकारी काळे,वरिष्ठ भुवॆज्ञानिक कराड, जिल्हा क्रुषी अधिकारी खर्चान, शेन्दुरजनाघाट चे नगराध्यक्ष रुपेश मांडळे, जिपसदस्य राजेन्द्र बहुरूपी, , बीडिओ राठोड ,असिस्टंट बिडिओ सुभाष बोपटे, , तहसीलदार आशिष बिजवल, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, नायब तहसिलदार सुदर्शन शहारे, पाणी फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक , अतुल काळे, तालुका समन्वयक गौरीताई फुटाणे, तालुका समन्वयक उज्वल कराळे ,वनाधिकारी काळे, सीडिपिओ राजेन्द्र पाटील,जिल्हा क्रुषी अधिकारी ,तालुका क्रुषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार कर्मचारी, पञकार मंडळी,अनेक,सार्वजनिक संस्थेचे सदस्य, आंगनवाडी सेविका,पतंजलि परिवार, कीर्तनकार ,समाजप्रबोधनकार,सह अनेकांची वाटरकपच्या नियोजन सभेला उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन बुरंगे सर, जिल्हा समन्वयक अतुल काळे, यांनी केले आभार प्रदर्शन न करता सर्वाना हजर राहल्याबद्दल जिल्हा समन्वयक अतुल काळे यांनी सर्वांना शाबासकी दिली !