ठाणेदार मुकुंद कवाडे यांची कार्यवाही

0
873
Google search engine
Google search engine

👉🏻अवैध वाळूची तस्करी करणारा आयशर शिरजगाव पोलिसांच्या जाळ्यात

👉🏻2 आरोपीना अटक आणि जामिनावर सुटका


चांदुर बाजार :-

शिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये येणाऱ्या बहिराम चेक पोस्ट वर आयशर कंपनीचा मोठा ट्रक हा अवैध पणे रेतीची वाहतूक करताना शिरजगाव पोलिसांना दिनांक 19 मार्च ला सायंकाळी 7.30 दरम्यान आढळून आला.

पोलिसांनी या चेक पोस्ट वर ट्रक ला अडविले आणि विचारपूस आणि रेती वाहतूक असल्याचा परवाना विचारला असता परवाना नसल्याचे ट्रक ड्रायवर नितेश जयंत टेहरे वय 24 वर्ष परसापूर यांनी सांगितले. तसेच या ट्रक ची वाहतूक करण्यासाठी ट्रक मालक निलेश विश्वासराव आखरे रा.सावली ता अचलपूर यांनी सांगितले असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती मिळाली.

या मध्ये शिरजगाव गाव पोलिसांनी 2 ब्रास रेती अंदाजित किंमत 10000 आणि आयशर किंमत 1200000 अशी एकूण 1210000 रुपये चा माल जप्त केला आहे.

या मध्ये अटक केलेल्या दोन्ही आरोपी ट्रक मालक निलेश विश्वास राव आखरे आणि निलेश जयंत टेहरे याना दिनांक 20 मार्च न्यायालयात हजर केले असता त्यांना बेल मिडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सदर कार्यवाही ठाणेदार मुकुंद कवाडे आणि त्यांच्या टीम ने केली.