आज रेल रोको कृती समितीसुध्दा करणार एस. एस. उटाणे यांचा सत्कार >< कॉ. मा. प्राचार्य उटाणे नागरी सत्कार समितीचे आयोजन

0
1120
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) –
    कॉ.प्राचार्य उटाणे नागरी सत्कार समिती, चांदूर रेल्वे यांच्या वतीने आज २४ मार्च ला सायंकाळी ५ वाजता कॉ. मा. प्राचार्य एस.एस.उटाणे यांचा भव्य जाहिर नागरी सत्काराचे आयोजन स्थानिक रामनगर येथील खुल्या मैदानावर करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात रेल रोको कृती समिती सुध्दा एस. एस. उटाणे यांचा जाहीर सत्कार करणार आहे.
      चांदूर रेल्वे येथे अशोक महाविद्यालयात नोकरी निमित्त आलेले कॉ.प्राचार्य एस.एस.उटाणे यांनी नोकरी सांभाळून शेतकरी, शेतमजुरांच्या हक्कासाठी लढा उभारून न्याय मिळवुन दिला. प्राध्यापकांची नोकरी करीत पक्षाच्या अनेक आंदोलनात उडी घेतली, त्यामूळे त्यांना अनेकदा तुरूंगवासही झाला. त्यांच्या कार्याची आठवण व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रेल रोको कृती समितीतर्फे याच कार्यक्रमात श्री. उटाणे यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार असल्याचे रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, राजाभाऊ भैसे, मेहमुद हुसैन, डॉ. क्रांतिसागर ढोले, शेख हसनभाई, संजय डगवार, गौतम जवंजाळ, भिमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, रामदास कारमोरे, भिमराव बेराड, अजय चुने, विनोद लहाने, कमलकिशोर पनपालीया, मनोज महाजन, पंकज गुडधे, प्रसेनजित तेलंग, बंडुभाऊ यादव, गौरव सव्वालाखे, चंदु बगाडे, प्रमोद बिजवे, मंगेश डाफ, सुधीर सव्वालाखे, अजमत खान, गोपाल मुरायते आदींनी कळविले आहे.