अवैध गुटका विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात – आरोपी अटकेत – लाखोंचा माल जप्त

302
जाहिरात

चांदुर बाजार / शशिकांत निचत –

चांदुर बाजार पोलिसात स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या 3 अवैध गुटखा माफियांना आज गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली असता त्यांच्या जवळून लाखो रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले

आरोपी मदन भट,संजय मंगल आणि ईश्वर ठाकरे रा चांदुर बाजार भट पुरा, यांच्या व्यापारी प्रतिष्ठान रेड करण्यात आली त्याच्या दुकानात बंदी असलेले तंबाखू जन्य गुटखा जप्त करण्यात आला.यामध्ये पोलिसांनी गुटखा जप्त केला असून तिन्ही आरोपी याना ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या या कार्यवाही मूळे चांदुर बाजार तालुक्यातील अनेक गुटखा माफिया यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. सदर कार्यवाही मुळे तालुक्यातील अन्य गुटखा विक्री वर अंकुश लागेल हे नक्की

वरील कार्यवाही अचलपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मीना (IPS),यांनी स्वतः आणि चांदुर बाजार येथील ठाणेदार सुनील वायधंदे यांच्या पोलीस टीम ने केली.या मध्ये चांदुर बाजार चे पोलीस उपनिरीक्षक अनिल कविटकर,पोलीस कॉस्टबल अनिल इंगळे,निकेश नसीबकर, पोलीस स्टेशन खुपिया प्रशांत भटकर,अनिल मोरे,अतुल भुयार यांनी केली. औषध आणि अन्न प्रशासन याना या संबंधी कळविले असून सध्या पोलीस त्या गुटख्याच्या पंचनामा करीत आहेत

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।