नक्षलवाद संपविण्यातील पोलिसाचे कार्य प्रशंसनीय -श्री हंसराज अहीर

0
607
Google search engine
Google search engine

गडचिरोली:- केंद्रीय राखीव पोलिस दल आणि गडचिरोली पोलिस दलाचे जवान या भागाची नक्षलग्रस्त म्हणून असणारी ओळख पुसण्याचे काम प्रशंसनियरित्या करीत आहेत. सोबतच नागरिकांना उपजिविकेसाठी देखील सहाय्य करतात हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील अशा भामरागड तालुक्यात सीआरपीएफ च्या 37 व्या बटालियन तर्फे नागरी कृती कार्यक्रमांतर्गत गरजू, गरीब महिलांना शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम मंत्री महोदयांच्या हस्ते आज पार पडला याप्रसंगी ते बोलत होते.
खरे तर या जवानांनी देशाच्या सिमेवर असायला हवे मात्र नक्षलवाद संपवण्यासाठी त्यांना इतक्या दुर्गम भागात काम करावे लागते असे अशी खंत व्यक्त करतानाच जावानांनी नक्षलवाद संपवण्यासाठी आतापर्यंत केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव या वेळी आपला भाषणातून केला.

येथे नागरी कृती कार्यक्रमांतर्गत 42 महिलांना 3 महिन्यांचे शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी 40 जणींना आज शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले सोबतच नववी व दहावी उत्तीर्ण 40 विद्यार्थिंनीना संगणक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
या कार्यक्रमास खासदारअशोक नेते, विशेष पोलिस महानिरिक्षक कनकरत्नम, टी.शेखरे, 37 सीआरपीएफ बटालियनचे श्रीराम मीणा, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, सर्वप्रथम हसरांज अहीर यांचे स्वागत करण्यात आले. ना.अहीर यांनी लोक बिरादरी प्रकल्पास भेट देऊन प्रकाश आमटे व आमटे परिवाराची भेट घेतली. त्यानंतर प्राणी सग्रहलयाची पाहणी केली.या तालुक्यात प्रकाश आमटे चागले कार्य करीत असून शिक्षण क्षेत्रात सुध्दा मोलाचे कार्य करीत आहेत असे गौरवोद्वार या प्रसंगी त्यांनी काढले.

.