भगवान महावीरांच्या  मूल्यांचे आचरण केले पाहिजे

0
626

बीड: नितीन एस ढाकणे

अहिंसा परमोधर्म भगवान महावीर यांनी अहिंसेची शिकवण दिली, संपूर्ण जगाला भगवान महावीरांच्या  मूल्यांचे आचरण केले तरच आपली प्रगती साध्य करु शकतो. यशस्वी जीवन प्रवासासाठी भगवान महावीर यांचे विचार आणि संयम आणि अनुशासनाची गरज असल्याचे प्रतिपादन जैन साध्वी पुनितज्योती यांनी केले.

शहरातील गुजराती कॉलनीतील तेरा पंथ भवनापासून अहिंसा रॅलीला प्रारंभ झाला. डीपी रोड, सुभाष रोड भाजीमंडई मार्गे कारंजा, बलभीम चौकातून रॅली जुन बाजार येथील वासूपूज्य दिगंबर जैन मंदिराजवळ पोहचली. त्यानंतर भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव तथा अभिषेक करण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन नितीनचंद्र कोटेचा, ताराचंद कोटेचा, अतुल मौजकर, आशीष जैन, रोशन समदरिया, नरेंद्र महाजन यांच्या उपस्थितीत झाले. रोशन समदरिया यांनी आभार मानले.