*आकोट पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने फळ विक्रेत्यांना मिळाली हक्काची जागा*

0
765
Google search engine
Google search engine

आकोट (संतोष विणके )-

अकोट शहर हे अति संवेदनशील शहर म्हणून कुप्रसिद्ध आहे, ह्या शहरात छोट्या मोठ्या कारणामुळे ह्या पूर्वी बऱ्याच दंगली झालेल्या आहेत, शहर वाढले, शहराची लोकसंख्या वाढली पण रस्ते तसेच राहले, त्या मुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते, त्यातच शिवाजी चौक ते सोनू चौक ह्या रस्त्यावर मुख्य बाजारपेठ असाल्याने कायम गर्दी असते,तसेच खरेदी करणाऱ्या ग्राहकांची वाहने दुकाना समोर लागत असलेला रोड आणखी छोटा होतो, त्या मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, त्यातच हातगाडीवरून फळ विक्री करणारे फेरीवाले हे सुद्धा ह्याच रोडवर हातगाडी लावीत असल्याने वाहतुकीस आणखी अडथळा निर्माण होतो, माञ आकोट शहर ठाणेदार श्री गजानन शेळके यांनी पालीका प्रशासनासी चर्चा करुन ह्या समस्येवर उपाय काढला यासाठी त्यांनी फेरीवाल्या फळविक्रेत्यांना शिवाजी चौका जवळील माता मैदान कडे जाणाऱ्या मोकळ्या जागेत पर्यायी जागा उपलब्ध करुन दिली.यामुळं फेरीवाल्यांमुळं होणारी वाहतुक कोंडी तथा वाहनांना निर्माण होणारा अडथळा संपुष्टात येणार आहे. याआधी सुरळीत वाहतुकीसाठी पोलीस नेहमी त्यांना हुसकवीत असत प्रसंगी त्यांचेवर कारवाई सुद्धा करत पण त्यांना फळविक्री करण्या साठी पर्यायी जागा नसल्याने ते रस्त्यावरच भटकून फळविक्री करीत होते, ते ज्या दुकाना समोर हातगाडी लावीत त्यावरुन ही वादविवाद होत असत, बऱ्याच दा तर ह्या वादाला जातीय वळण मिळून त्याचे रूपांतर हे कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती निर्माण व्हायची. ह्यामुळं शहर वेठीस धरल्या जायचे.हे लक्षात घेऊन अकोट शहर पोलीस निरीक्षक श्री गजानन शेळके ह्यांनी सर्व फळविक्रेते ह्यांची मीटिंग घेत त्यांना नगर पालिका प्रशासनाच्या सहकार्याने पर्यायी जागा उपलब्ध करुन दिली. जागा दिल्यावर कोणीही रोडवर हातगाडी लावून फळविक्री केल्यास त्याचे विरुद्ध पोलीस धडक कार्यवाही करतील अशी तंबी दिली त्यांसाठी जागेचे नंबर वाटप करण्यात येऊन, फळविक्री करण्याच्या सूचना मीटिंग घेऊन देण्यात आल्या,जाण्या येण्या साठी नालीवर धापा सुद्धा कादिर ठेकेदार ह्यांचे मदतीने पोलीस प्रशासनाकडून टाकून देण्यात आला, पोलिस प्रशासन आपल्या साठी एवढे करत आहेत तर ह्या नंतर रोड वर फळविक्री न करण्याचे ठरवून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन फळवीक्रेत्यांनी प्रशासनास दिले, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी घेतलेल्या पुढाकाराने फळविक्रेत्यांचा अनेक वर्षापासूनचा जागेचा प्रश्न तात्पुरता का होईना , सुटल्याने सर्व गरीब फळविक्री करणाऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत तर वाहतुकीची होणारी कोंडी सुटल्याने व्यापारी तथा सामान्य नागरीकांनीही समाधान व्यक्त केले आहे.