अखेर तीन दिवसानंतर 23 वाहन तामगांव पो.स्टे.च्या आवारात-वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

0
746
Google search engine
Google search engine

संग्रामपुर / दयालसिंग चव्हाण –

:- तालुक्यातील खेळ दळवी पुर्णा नदी पात्रात अवैधरित्या उपसयाचे 23 ट्रक वाहनावर दिनांक 27 मार्च रोजी कार्यवाही करण्यात आली होती. घटनास्थळावर या ट्रकाचे चालक व मालक फरार असुन पंचनामा पुर्ण करता आला नाही. मात्र पंचनाम्यावर गाडी नंबर व रेतीचे प्रमाण नोंदविले होते. रेती चोरीमुळे पूर्णा नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. शेकडो ब्रास रेतीची चोरी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. विशेष म्हणजे वाहन चालक नदीतच वाहने सोडून फरार झाले असल्याने १२ पोलिस कर्मचारी दोन दिवस नदी पात्रात मुक्कामी होते. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये रेतीचा अवैध साठा आहे. २३ वाहनचालकांच्या यादीसह जप्त केलेल्या वाहनांचे क्रमांक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे वाहनमालकांचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. पूर्णा नदीपात्रात वाहने उभी असून या वाहनांभोवती तामगाव पोलिसांचा बंदोबस्त होता.त्याकरीता दिनांक 28 मार्च रोजी तहसिलदार एस.एच.राठोड यांनी अवैध रित्या वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांवर एफआयआर दाखल करुन कार्यवाही करण्याकरीता तामगांव पोलिस स्टेशन लेखी पत्र देण्यात आले .या प्रकरणी नायब तहसीलदार डी.ए.पवार यांच्या फिर्यादीवरून तीन दिवसांनंतर २३ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

प्राप्त़ माहितीनुसार तहसिलदार तर्फे नायब तहसिलदार डी.ए.पवार यांनी फिर्याद दिल्यानुसार पोलिस स्टेशन अ.नं.55/18 कलम 379 भादवि सह कलम 21,(1), गौण व खनिज विनीयम अधिनीयम 1957 नुसार आरोपी चालक व मालक यांच्यावर दिनांक 28 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये वरनमुद वाहन चालक व मालक यांनी हर्रास न झालेल्या नदी पात्रातुन एकुण 49 ब्रास रेती प्रत्येक वाहन 3100 रुपये प्रमाणे एकुण 151900 रुपयाचा अवैधपणे रेती चोरी करतांना दिसुन आल्याने याप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन सर्व वाहनाचे चालक व मालक फरार असल्याने तामगांव पो.स्टे.यांनी खाजगी चालक यांच्या सहकार्याने नदीपात्रातुन सर्व वाहन पो.स्टे.चे आवारात लावण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार डिगांबर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राम पारवे करीत आहे